पॅन कार्ड मिळवण्यासंबंधीचे नियम १ एप्रिल २०२६ पासून बदलणार आहेत; परिणामी, केवळ आधार कार्डच्या आधारे नवीन पॅन कार्ड मिळवणे ही प्रक्रिया यापुढे तितकीशी सोपी राहणार नाही.
औसा मतदारसंघातील महिला बचत गटांना स्वतःची हक्काची व सुसज्ज जागा उपलब्ध करून देत त्यांच्या सक्षमीकरणाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच, ४ विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली.
भारतीय शेअर बाजार विविध सण आणि काही महत्त्वाच्या प्रसंगी बंद असतात. आज, ३१ मार्च रोजी, देशभरात महावीर जयंती साजरी केली जात आहे. महावीर जयंतीनिमित्त BSE आणि NSE हे दोन्ही बाजार बंद राहतील.
केंद्र सरकारने लहान बचत योजनांवर महत्वाची घोषणा केली. एप्रिल-जून या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवतील. या निर्णयाचा परिणाम म्हणून, PPF, NSC आणि KVP सारख्या योजनांवरील व्याजदर कायम राहील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत काही तरतुदींचे पालन न केल्याने बँकेवर ३१.८० लाखांचा दंड ठोठावला आहे.
भारतीय रुपयाचे मूल्य २८ पैशांनी घसरले असून, त्याने ९४.२४ रु. या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. देशांतर्गत शेअर बाजार आणि जागतिक बाजारपेठांमध्ये पसरलेल्या अस्थिरतेमुळे रुपया घसरला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका बँकेत कार्यरत असलेल्या चाळीस वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रिलायन्स टेलिकॉम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. यामुळे माजी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याची (डीए) प्रतीक्षा आणखी लांबली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणेची अपेक्षा होती, परंतु बैठकीनंतर सरकारने महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली नाही.
भारतात दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली 'नोकिया' त्यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून, नोकियाच्या भारतातील कामकाजाची धुरा २ अनुभवी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे