Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…लवकरच दाखल होणार हा आयपीओ, सेबीकडे डीआरएचपी दाखल! गुंतवणूकदारांना मोठी संधी

डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअर या नेत्रसुश्रृषा सेवा कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) द्वारे निधी उभारण्यासाठी बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला प्राथमिक प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 30, 2024 | 05:37 PM
...लवकरच दाखल होणार हा आयपीओ, सेबीकडे डीआरएचपी दाखल! गुंतवणूकदारांना मोठी संधी (फोटो सौजन्य - istock)

...लवकरच दाखल होणार हा आयपीओ, सेबीकडे डीआरएचपी दाखल! गुंतवणूकदारांना मोठी संधी (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअर या नेत्रसुश्रृषा सेवा कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) द्वारे निधी उभारण्यासाठी बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला प्राथमिक प्रस्ताव सादर केला आहे. प्रति शेअर एक रुपये दशनी मूल्य असलेल्या या आयपीओत 300 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर आणि प्रवर्तक आणि अन्य समभागधारकांचे 69,568,204 समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) यांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना गुंतवणूकीसाठी विशिष्ट हिस्सा आरक्षित असणार आहे.

ऑफर फॉर सेलमधील शेअर्सची विक्री

ऑफर फॉर सेलमध्ये डॉ. अमर अग्रवाल यांचे 2,253,913 इक्विटी समभाग आणि डॉ. अथिया अग्रवाल यांचे 2,704,696 इक्विटी समभाग आहेत. त्याचबरोबर डॉ. आदिल अग्रवाल यांचे 2,961,614 इक्विटी समभाग, डॉ. अनोश अग्रवाल यांचे 5,242,630 इक्विटी समभाग, डॉ. अश्विन अग्रवाल यांचे 230,035 इक्विटी समभाग, डॉ. अग्रवाल आय इन्स्टिट्यूटद्वारे 1,963,172 इक्विटी समभाग, ॲरव्हॉन इनव्हेस्टमेंट पीटीई लिमिटेडद्वारे 7,083,010 इक्विटी समभाग, क्लेमोर इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) पीटीई लिमिटेडद्वारे 16,148,150 इक्विटी समभाग, हायपेरिऑन इनव्हेस्टमेंट पीटीई लिमिटेडद्वारे 30,755,592 इक्विटी समभाग, फराह अग्रवाल यांचे 12,696 इक्विटी समभाग आणि उर्मिला अग्रवाल यांच्या 112,696 इक्विटी समभागाची विक्री करण्याची योजना आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – 48 लाख विवाह, 5.9 लाख कोटींचा व्यापार; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार चालना!

कुठे वापरला जाणार निधी

ताज्या शेअर्समधून मिळालेल्या रक्कमेपैकी 195 कोटी रुपयांपर्यंतचा निधी आधी घेतलेल्या कर्जाच्या अंशतः किंवा पूर्ण परतफेड/ मुदतपूर्व परतफेडीसाठी; कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी आणि आकस्मिक अजैविक संपादन या कारणांसाठी वापरला जाणार आहे. नेत्रसेवा क्षेत्रात 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या डॉ. अमर अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अग्रवाल हेल्थ केअर नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवत आहे. त्यामध्ये मोतीबिंदू, अपवर्तक आणि इतर शस्त्रक्रिया, सल्लामसलत, निदान, गैर-शस्त्रक्रिया उपचार आणि ऑप्टिकल उत्पादनांची विक्री, कॉन्टॅक्ट लेन्स, उपकरणे आणि डोळ्यांची निगा राखण्याशी संबंधित औषधी वस्तू आदींचा समावेश आहे.

कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती

डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअरचा आर्थिक वर्ष 2023 मधील कामकाज महसूल 1,017.98 कोटी रुपयांवरून, 2024 आर्थिक वर्षात 1,332.15 कोटी रुपयांवर झेपावला आहे. त्यात 30.86 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीचा करोत्तर नफा 95.05 कोटी रुपये इतका नोंदविला गेला. तर भारतीय नेत्रसेवा उद्योग आर्थिक वर्ष 2024 पासून आर्थिक वर्ष 2028 पर्यंत चक्रवाढ वार्षिक दराने 12 ते 14 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय नेत्र चिकित्सा सेवा उद्योगाचा आकार अंदाजे 37,800 कोटी रुपये होता. तो आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 55,000 कोटी ते 65,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title: Dr agrawals health care eye care services company ipo to be filed soon drhp filed with sebi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 05:34 PM

Topics:  

  • Initial Public Offering
  • IPO

संबंधित बातम्या

४ IPO लाँच करण्यात येणार! Groww च्या IPO वर सगळ्यांची नजर
1

४ IPO लाँच करण्यात येणार! Groww च्या IPO वर सगळ्यांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.