Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 04, 2025 | 08:30 PM
ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ

ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. सध्या बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचे व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

जनतेच्या रेट्यानंतर दर खाली

दोन वर्षांपूर्वी देशात महागाईची लाट आली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या होत्या. सोबतच किरकोळ महागाईने डोके वर काढले होते. खाद्यतेलाचा भडका उडाला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनक्षोभ वाढला होता. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशातंर्गत खाद्यतेलाच्या किंमती जमिनीवर आल्या.

‘हा’ आयपीओ बनलाय सिनेतारकांचा चांगलाच पसंती; तुम्हीही होऊ शकतात मालामाल!

आता केंद्र सरकारने सोयाबीन दर वाढवला आहे. तर 20 टक्के आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. नवी मुंबई एपीएमसी बाजारात दरमहा 7 ते 8 टन तेलाची आयात होते. पण मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे. तेलाचे 30 टक्के दर वधारले आहेत, अशी माहिती एपीएमसीमधील व्यापार्‍यांनी दिली आहे.

असे भडकले खाद्यतेल

सूर्यफूल तेलाचा भाव पूर्वी 120 रुपये प्रति किलो होता. आता त्यात किलोमागे 20 रुपयाची भाव वाढ झाली. सूर्यफूल तेल प्रति किलो 140 रुपयांवर पोहचले. पाम तेलाचा भाव 100 रुपये प्रति किलो होता. हा भाव आता 135-140 रुपयांवर पोहचला आहे. किलोमागे पाम तेल 35-40 रुपयांनी महागले आहे. तर सोयाबीन तेल 115-120 रुपये प्रति किलोवरून थेट 130-135 रुपयांवर पोहचले आहे. किलोमागे 20 रुपयांची दरवाढ दिसून येत आहे. ऐन थंडीत ग्राहकांना वाढीव दराने तेल खरेदी करावे लागत आहे. या महागाईने किचन बजेट कोलमडले आहे.

Web Title: Edible oil prices increase in the dead of winter increase by rs 25 per kg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 08:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.