'हा' आयपीओ बनलाय सिनेतारकांचा चांगलाच पसंती; तुम्हीही होऊ शकतात मालामाल!
शेअर बाजारात सध्या काहीसा चढ-उतरणीचा काळ सुरु आहे. अशातच काही आयपीओ देखील शेअर बाजारात दाखल होत आहे. असाच एक आयपीओ हा देशातील सिनेतारकांच्या चांगलाच पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सारा अली खान, हृतिक रोशन आणि राजकुमार राव यांनी श्री लोटस डेव्हलपर्स आणि रिॲलिटी लिमिटेडच्या आगामी आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. या आयपीओमध्ये सिनेमॅटिक दिग्गजांच्या गुंतवणुकीवरून हे स्पष्ट झाले आहे की, कंपनी 792 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
शाहरुख खानला दिले 6.75 लाख शेअर्स
श्री लोटस डेव्हलपर्स आणि रियालिटीने 24 डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रॉस्पेक्टसनुसार, शाहरुख खानच्या फॅमिली ट्रस्टला 06 लाख 75 हजार शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांना 06 लाख 66 हजार 670 शेअर्स देण्यात आले आहेत. हृतिक रोशनला 70 हजार शेअर्स आणि टायगर श्रॉफला 33 हजार 300 शेअर्स देण्यात आले आहेत. राकेश रोशन, साजिद नाडियादवाला, आशिष कचोलिया, एकता रवी कपूर, तुषार रवी कपूर आणि जितेंद्र कपूर यांचीही नावे या यादीत आहेत.
पाणीपुरीवाल्याला मिळाली 40 लाखांच्या जीएसटीची नोटीस; सोशल माध्यमांवर उडालीये खळबळ!
आशिष मल्टी बॅगर स्टॉक्स ओळखण्यासाठी प्रसिद्ध
एका नामांकित वृत्तसमूहाच्या वृत्तानुसार, अजय देवगणसह इतर अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची नावे या यादीत समाविष्ट आहेत. सर्वात धक्कादायक नाव आहे ते आशिष कचोलियाचे. आशिष कचोलिया मल्टीबॅगर स्टॉक ओळखण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याच कारणामुळे त्याला भारतीय शेअर बाजारात बिग व्हेल म्हणूनही ओळखले जाते.
डिसेंबरमध्ये सेबीकडून मागितली होती परवानगी
मुंबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी श्री लोटस डेव्हलपर्स अँड रिॲलिटी लिमिटेडने डिसेंबरमध्येच सेबीकडे एक मसुदा दाखल केला होता आणि आयपीओसाठी परवानगी मागितली होती. हा विकासक मुंबई आणि आसपासच्या परिसरात निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित करतो. या आयपीओमध्ये विक्रीसाठी कोणतीही ऑफर असणार नाही. सर्व सार्वजनिक आणि ताजे मुद्दे असतील. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)