Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 दिवसांत काढू शकाल पीएफमधून 1 लाख रुपये; तुम्हाला माहितीये का ‘हे’ नियम!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) अकाउंटमधून पैसे काढण्याचा दावा करण्यासाठी पूर्वी १५ ते २० दिवस लागायचे. मात्र, आता हे काम ३ ते ४ दिवसांत सहज होते. तुम्हालाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तुमच्या खात्यातून तात्काळ पैसे काढायचे आहेत का? मग ही बातमी शेटवाटपर्यंत वाचा...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 09, 2024 | 07:32 PM
पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी! थेट एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, वाचा... कसे ते?

पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी! थेट एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, वाचा... कसे ते?

Follow Us
Close
Follow Us:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच समस्या कमी झाल्या आहेत. ईपीएफओने वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माण हेतूंसाठी आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-मोड सेटलमेंटची सुविधा देखील प्रदान केली आहे. ज्या पीएफ खातेधारकांचे उत्पन्न 6 कोटींपेक्षा जास्त आहे. ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना निधी उपलब्ध करून देणारी ही सुविधा आहे.

केवळ दिवसांत मिळणार पीएफचे पैसे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) अकाउंटमधून पैसे काढण्याचा दावा करण्यासाठी पूर्वी १५ ते २० दिवस लागायचे. मात्र, आता हे काम ३ ते ४ दिवसांत सहज होते. प्रामुख्याने सदस्याची पात्रता, कागदपत्रे, ईपीएफ खात्याची केवायसी स्थिती, बँक खाते इत्यादी तपशील तपासण्यात वेळ यायचा. त्यामुळे हा अवधी लागायचा. मात्र, आता स्वयंचलित प्रणालीमुळे हे काम सोपे झाले आहे. तुम्हालाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तुमच्या खात्यातून तात्काळ पैसे काढायचे आहेत का? मग खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

हेही वाचा : बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार; लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर!

कोण करू शकतो पैशांसाठी दावा?

आपत्कालीन परिस्थितीत ईपीएफओ निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड एप्रिल 2020 मध्येच सुरू करण्यात आला होता. परंतु त्या वेळी केवळ आजारपणातच पैसे काढता येत होते. आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तुम्ही आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी ईपीएफओमधून पैसे काढू शकतात. याशिवाय जर घरात बहीण आणि भावाचे लग्न झाले असेल तर अशी व्यक्ती देखील आपल्या ईपीएफओ खात्यातून पैसे काढू शकते.

खातेधारक किती रक्कम काढू शकतात?

ईपीएफओ खात्यातून खातेधारकांना 1 लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये इतकी होती. विशेष म्हणजे आता पैसे काढण्यासाठी दावा केल्यांनतर, तीन दिवसांत पैसे तुमच्या खात्यावर पाठवले जातील. यासाठी केवायसी, दाव्याच्या विनंतीची पात्रता, बँक खात्याचा तपशील देणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा : …सर्व भारतीयांना मिळणार मोठे गिफ्ट; नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्याने ‘ही’ कंपनी पूर्ण करणार वादा!

काय आहे पैसे काढण्याची संपूर्ण प्रोसेस?

– सर्व प्रथम UAN आणि पासवर्ड वापरून ईपीएफओ ​​पोर्टलवर लॉगिन करा.
– आता तुम्हाला ऑनलाइन सेवांवर जाऊन ‘क्लेम’ विभाग निवडावा लागेल. बँक खाते सत्यापित करा, ऑनलाइन दाव्यासाठी ‘पुढे जा’ वर क्लिक करा.
– नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 निवडावा लागेल. आता तुम्हाला पीएफ खाते निवडावे लागेल.
– आता तुम्हाला पैसे काढण्याचे कारण, किती पैसे काढायचे आणि पत्ता भरावा लागेल. यानंतर चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
– यानंतर तुम्हाला संमती द्यावी लागेल आणि आधारशी पडताळणी करावी लागेल. दाव्यावर प्रक्रिया केल्यानंतर, तो मंजुरीसाठी तुमच्या संबंधित कंपनीकडे जाईल.
– तुम्ही ऑनलाइन सेवेअंतर्गत दाव्याची स्थिती तपासू शकतात.

Web Title: Epfo rule change you can claim one lakh rupees under pf advance just in 3 days know process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 07:32 PM

Topics:  

  • EPFO

संबंधित बातम्या

आजारपण, लग्न किंवा शिक्षणासाठी PF क्लेम करणे झाले आणखी जलद, पैसे कसे ट्रान्सफर करायचे जाणून घ्या
1

आजारपण, लग्न किंवा शिक्षणासाठी PF क्लेम करणे झाले आणखी जलद, पैसे कसे ट्रान्सफर करायचे जाणून घ्या

7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, सरकारने EPFO संदर्भात दिली ‘ही’ अपडेट; PF वर होईल थेट परिणाम
2

7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, सरकारने EPFO संदर्भात दिली ‘ही’ अपडेट; PF वर होईल थेट परिणाम

PF नोकरदारांना मिळणार ‘दिवाळी’ भेट; पेन्शनमध्ये वाढ आणि मिळणार ‘या’ खास सुविधा
3

PF नोकरदारांना मिळणार ‘दिवाळी’ भेट; पेन्शनमध्ये वाढ आणि मिळणार ‘या’ खास सुविधा

EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता ८.८ लाखांऐवजी मिळतील १५ लाख रुपये; जाणून घ्या
4

EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता ८.८ लाखांऐवजी मिळतील १५ लाख रुपये; जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.