First Crypto Credit Card Launched
दिल्ली : गेल्या काही वर्षांत क्रिप्टोची क्रेझ लोकांमध्ये खूप वेगाने वाढली आहे. क्रिप्टोचा वाढता वापर पाहता आता क्रिप्टो क्रेडिट कार्डही बाजारात लाँच झाले आहे. हे सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणेच काम करेल. परंतु, या कार्डचे पेमेंट तुम्हाला बिटकॉइन, इथीरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीने करावे लागेल. हे कार्ड नेक्सो आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने बनवण्यात आले आहे(First Crypto Credit Card Launched ).
क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता या कार्डचा लाभ मिळणार आहे. या कार्डमध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या कार्डद्वारे खरेदीसाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
नेक्सोने या कार्डबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, हे कार्ड सध्या फक्त युरोपीय देशांमध्येच लाँच केले जाईल. म्हणजे हे कार्ड सध्या भारतात वापरता येणार नाही. युरोपीय देशांमध्ये कार्डद्वारे युजर्स शुल्क न भरता आरामात खरेदी करू शकतील. तसेच, क्रिप्टो क्रेडिट कार्ड लाँच करताना, कंपनी तुमच्याद्वारे जमा केलेली क्रिप्टोकरन्सी गॅरंटी म्हणून ठेवेल.
साधारणपणे, बँका ग्राहकांना क्रेडिट कार्ड देतात, तेव्हा त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची गॅरंटी घेत नाहीत. मात्र, तुमच्याद्वारे क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये जमा केलेली डिजिटल अॅसेट गॅरंटी म्हणून धरली जाईल. या कार्डद्वारे, युजर्स डिजिटल अॅसेट खर्च न करता आणि कार्डवर कोणतेही शुल्क न भरता खरेदी करू शकतो. सामान्यतः, उपलब्ध सर्व क्रेडिट कार्ड गॅरंटीशिवाय जारी केले जातात परंतु, हे क्रेडिट कार्ड तुमच्या क्रिप्टोकरन्सीच्या ठेव मूल्याच्या 90 टक्के पर्यंत क्रेडिट लाइन मिळते. म्हणजेच, या कार्डद्वारे तुम्ही तुमच्या 90 टक्के ठेवी क्रिप्टोकरन्सीमध्ये खर्च करू शकता.
या कार्डची खास गोष्ट म्हणजे हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही मासिक शुल्क भरावे लागणार नाही. यासह, ग्राहकाला कमीत कमी परतफेड किंवा कार्ड निष्क्रिय शुल्क देखील भरावे लागणार नाही. या कार्डद्वारे 20 हजार युरो खर्च करण्यासाठी तुम्हाला कोणतेही कार्ड शुल्क भरावे लागणार नाही. याचबरोबर, तुम्हाला 20 हजार युरोपेक्षा जास्त खर्चावर व्याज द्यावे लागेल.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]