Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची स्टॉक एक्स्चेंज लिस्टेड कंपनीची अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही मंगळवारच्या (ता.3) ट्रेडिंग सत्रात 95 रुपये किंवा 8 टक्क्यांनी व्यापार करत आहे. हा शेअर मजबूत वाढीसह 1310 रुपयांवर पोहोचला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या शेअरने गुंतवणूकदारांना 1960 रुपयांच्या लक्ष्यापर्यंत हा स्टॉक पोहोचणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला एक दिवस आधीच नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने दिला आहे.
वर्षभरात 10 हजाराचे झाले 1 कोटी रुपये; 3 रुपयांवरून 2 लाख 36 हजारांपर्यंत पोहचली शेअरची किंमत!
कंपनीच्या कार्गो व्हॉल्यूममध्ये जोरदार वाढ
अदानी पोर्ट्सने स्टॉक एक्स्चेंजवर आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये 36 दशलक्ष टन कार्गो हाताळले आहे. जे दरवर्षी 21 टक्क्यांनी वाढले आहे. तर 2024 मध्ये नोव्हेंबरपर्यंत कंपनीने 293.7 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली. जी दरवर्षी 7 टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या लॉजिस्टिक रेल्वेचे प्रमाण वर्षानुवर्षे 10 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीच्या या फायलिंगमुळे आजच्या सत्रात अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
एकाच सत्रात शेअर 95 रुपयांनी वाढला
3 डिसेंबरच्या ट्रेडिंग सत्रात अदानी पोर्ट्सचा शेअर 1225 रुपयांवर उघडला. आणि 7.81 टक्क्यांच्या उसळीसह तो 1310 रुपयांवर पोहोचला आहे. एकाच सत्रात, या स्टॉकने मागील बंद किंमतीच्या 1215 रुपयांच्या पातळीपासून 95 रुपयांची वाढ नोंदवली आहे. स्टॉकमधील या नेत्रदीपक वाढीनंतर अदानी पोर्ट्सचे मार्केट कॅप 2.83 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या बाजार भांडवलात एकाच दिवसात 20,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने ‘या’ कंपनीवर केली मोठी कारवाई!
अदानी पोर्ट्सवर ब्रोकरेज हाउस तेजीत
सोमवार 2 डिसेंबर 2024 रोजी, नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अदानी पोर्ट्स आणि सेझ स्टॉकवर कव्हरेज अहवाल जारी केला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, स्टॉक 1960 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. जो सध्याच्या पातळीपेक्षा 660 रुपये किंवा 50 टक्के जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की, सध्याच्या पातळीवरही शेअर गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा देऊ शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने 1630 रुपये आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने 1530 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)