Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GE Aerospace Pune: जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुण्‍यातील उत्‍पादन सुविधेने साजरी केली कार्यसंचालनाची 10 वर्षे

GE Aerospace Pune: पुण्‍यातील उत्‍पादन सुविधा सीएफएमच्‍या लीप, जीईएनएक्‍स आणि जीई९एक्‍स इंजिन्‍ससाठी कम्‍पोनण्‍ट्स उत्‍पादित करते, जे जगभरातील कारखान्‍यांमध्‍ये ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी वापर

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Oct 14, 2025 | 07:01 PM
GE Aerospace Pune: जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुण्‍यातील उत्‍पादन सुविधेने साजरी केली कार्यसंचालनाची 10 वर्षे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

GE Aerospace Pune: जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुण्‍यातील उत्‍पादन सुविधेने साजरी केली कार्यसंचालनाची 10 वर्षे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

GE Aerospace Pune Marathi News: आज जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुण्‍यातील उत्‍पादन सुविधेने कार्यसंचालनांची दहा वर्षे साजरी केली, जो भारतातील विमान वाहतूक उद्योगामधील कंपनीच्‍या चार दशकांच्‍या इतिहासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरला. गेल्‍या दशकभरात पुणे व्‍यावसायिक जेट इंजिन कम्‍पोनण्‍ट्सच्‍या उत्‍पादनासाठी हब आणि प्रगत उत्‍पादन कौशल्‍य विकासासाठी केंद्र म्‍हणून उदयास आले आहे, जेथे त्‍यांच्‍या अॅप्रेन्टिस आणि इतर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून ५,००० हून अधिक उत्‍पादन सहयोगींना प्रशिक्षित करण्‍यात आले आहे.

“आम्‍ही पुण्‍यामध्‍ये आमची फॅक्‍टरी सुरू केली तेव्‍हा आमच्‍याकडे ऐरो -इंजिन परिसंस्‍था नव्‍हती. दहा वर्षांनंतर आम्‍ही जागतिक दर्जाचा उत्‍पादन कौशल्‍य आधार निर्माण करण्‍यासोबत मोठ्या ऐरोस्‍पेस क्षेत्राप्रती योगदान देखील दिले आहे. आम्‍ही महाराष्‍ट्रामध्‍ये उच्‍च-स्‍तरीय उत्‍पादन व कौशल्‍यासाठी विकसित केलेल्‍या स्‍थानिक क्षमतेचा मला अभिमान वाटतो,” असे जीई ऐरोस्‍पेसच्‍या ग्‍लोबल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग ऑपरेशन्‍स अँड सप्‍लाय चेनचे कार्यकारी संचालक अमोल नागर म्‍हणाले.

2047 पर्यंत 80 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.5 कोटी सागरी रोजगाराच्या संधी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

पुण्‍यातील उत्‍पादन सुविधा सीएफएमच्‍या लीप (LEAP), जीईएनएक्‍स आणि जीई९एक्‍स इंजिन्‍ससाठी कम्‍पोनण्‍ट्स उत्‍पादित करते, जे जगभरातील कारखान्‍यांमध्‍ये ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी वापरले जातात. या सुविधेच्‍या यशाला जीई ऐरोस्‍पेसचे प्रोप्रायटरी लीन ऑपरेटिंग मॉडेल फ्लाइट डेकचे पाठबळ आहे, जे सुरक्षितता, दर्जा व कार्यक्षमतेला प्राधान्‍य देते.

फ्लाइट डेक तैनात करत आणि शॉप फ्लोअरवरील कर्मचाऱ्यांच्‍या १,००० हून अधिक शिफारशींचा फायदा घेत या सुविधेने अपव्‍यय कमी केला आहे, प्रक्रिया कार्यक्षमता वाढवली आहे आणि आऊटपूट वाढवले आहे, तसेच शॉप-फ्लोअरवरील सुरक्षितता सुधारली आहे. महत्त्वपूर्ण कम्‍पोनण्‍टसाठी नवीन मॉडेल लाइनसह या सुविधेने कमी लीड टाइम शक्य केला आहे, त्‍याच टीमसोबत उत्‍पादकता वाढवली आहे आणि डाऊनटाइम कमी केला आहे. ती लाइन आता सहा तिमाहींपेक्षा अधिक कालावाधीदरम्‍यान करण्‍यात आलेल्‍या अनेक सुधारणांच्‍या मदतीने दुप्‍पटीहून अधिक पार्ट्सची निर्मिती करते.

“पुण्यातील कम्‍पोनण्‍ट्स आमच्या जागतिक कारखान्यांमध्ये वापरले जातात, जेथे ते सीएफएमचे लीप, जीईएनएक्‍स आणि जीई९एक्‍स इंजिन्‍स डिझाइन करण्यासाठी वापरले जातात. आम्‍हाला सुरक्षितता आणि दर्जावर लक्ष केंद्रित करण्‍यासह आमच्या फ्लाइट डेक प्रोप्रायटरी लीन ऑपरेशन्स मॉडेलचा वापर करून जगभरातील ग्राहकांना सेवा देण्यास आणि त्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचा आनंद होत आहे,” असे जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुण्‍यातील उत्‍पादन सुविधेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विश्वजीत सिंग म्हणाले.

उत्‍पादनाव्‍यतिरिक्‍त पुण्‍यातील सुविधेने अभियांत्रिकी टॅलेंटला अचूक उत्‍पादनामध्‍ये प्रशिक्षण देत शक्तिशाली स्‍थानिक ऐरोस्‍पेस कर्मचारीवर्ग निर्माण केला आहे. दरवर्षी नवीन बॅचेसमधील डिप्‍लोमा इंजीनिअर्सना वर्ग व शॉप फ्लोअर प्रशिक्षणामधून जावे लागते, त्‍यांना ऐरोस्‍पेस उत्‍पादन सुरक्षितता व दर्जाच्‍या उच्‍च मानकांचा अनुभव दिला जातो. जीई ऐरोस्‍पेस अर्ध-वेळ पदवीधर अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमांना देखील प्रायोजित करते, ज्‍यामुळे इंजीनिअर्सची प्रतिभावान टीम तयार होते. आज, पुणे सुविधेमध्‍ये ३०० हून अधिक असे इंजीनिअर्स काम करत आहेत, तर इतर भारतातील ऐरोस्‍पेस क्षेत्रात सकारात्‍मक परिणाम घडवून आणत आहेत.

पर्यावरणीय स्थिरता हा पुणे सुविधेचा हॉलमार्क आहे. ही सुविधा ISO14001 आणि ISO45001 प्रमाणित आहे, जेथे ३० टक्‍के ऊर्जा वापर नवीकरणीय स्रोतांमधून केला जातो.

Stocks to Buy on Diwali: स्विगी, टीव्हीएस मोटरसह ‘या’ शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेजने दिले नवे लक्ष्य

Web Title: Ge aerospace pune ge aerospaces pune manufacturing facility celebrates 10 years of operations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

2047 पर्यंत 80 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.5 कोटी सागरी रोजगाराच्या संधी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा
1

2047 पर्यंत 80 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.5 कोटी सागरी रोजगाराच्या संधी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

Stocks to Buy on Diwali: स्विगी, टीव्हीएस मोटरसह ‘या’ शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेजने दिले नवे लक्ष्य
2

Stocks to Buy on Diwali: स्विगी, टीव्हीएस मोटरसह ‘या’ शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेजने दिले नवे लक्ष्य

Share Market Closing: बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील दबावामुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 297 अंकांनी खाली, निफ्टी 25145 वर बंद
3

Share Market Closing: बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील दबावामुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 297 अंकांनी खाली, निफ्टी 25145 वर बंद

सणासुदीतही प्रवास परवडणारा! विमान कंपनीने सुरू केली निश्चित भाडे योजना
4

सणासुदीतही प्रवास परवडणारा! विमान कंपनीने सुरू केली निश्चित भाडे योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.