Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याचे दर 8000 रुपयांनी कमी होणार; ‘हे’ आहे कारण…; वाचा… आजचे सोन्या-चांदीचे दर!

मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 81000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आता आगामी काळात सोन्याच्या दरात तब्बल ८००० रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 12, 2024 | 09:48 PM
सोन्याचे दर 8000 रुपयांनी कमी होणार; 'हे' आहे कारण...; वाचा... आजचे सोन्या-चांदीचे दर!

सोन्याचे दर 8000 रुपयांनी कमी होणार; 'हे' आहे कारण...; वाचा... आजचे सोन्या-चांदीचे दर!

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. अशातच आता (ता.१३) तुलसी विवाह असल्याने, अनेकांची येत्या काळात लग्नासाठी लगबग सुरु आहे. अशातच आता सोन्या-चांदीच्या दरात घट होत आहे. ही घसरण आगामी काळातही कायम राहणार असून, ती 72000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकते.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 81000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आता आगामी काळात सोन्याच्या दरात तब्बल ८००० रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.
(फोटो सौजन्य – istock)

आज (ता.१२) सराफा बाजारातील कमजोर जागतिक संकेतांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज अर्थात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १७५० रुपयांनी घसरून, ७७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जो गेल्या सत्रात तो 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 72000 रुपयांच्या आसपास खाली आला आहे. तर चांदीचा दर हा 92900 रुपये झाला आहे. सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरातही 1000 रुपयांनी झाली आहे.

हे देखील वाचा – आनंदाची बातमी… रिलायन्स कंपनी ‘या’ राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

देशातील विविध शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

दिल्ली – आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 77440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर तिची किंमत 91,000 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

मुंबई – आज मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 77290 रुपये आणि 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 70850 रुपये दराने उपलब्ध आहे. तर चांदीचा भाव 91,000 रुपये प्रति किलो आहे.

जयपूर – आज जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,००० रुपये इतकी आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.

कोलकाता – आज 24 कॅरेट सोने 77,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.

नोएडा – आज, नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.

लखनऊ – आज लखनऊमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 77440 रुपये आणि 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये दराने उपलब्ध आहे. तर चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.

पटना – पटनामध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७७,३४० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम रुपये ७०,९०० दराने विकले जात आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.

चेन्नई – चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 77290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 1,00,000 रुपये प्रति किलो आहे.

Web Title: Gold price may reach till rupees 72000 per 10 gram know todays rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 09:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.