Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा… काय आहे किंमत पट्टा!

बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी येत्या गुरुवारी (ता.7) आपल्या आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करणार आहे. प्रत्येकी 10 रुपये फेसव्‍हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 70 रुपये ते 74 रुपये असा प्राईस बँड आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 05, 2024 | 04:43 PM
गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा... काय आहे किंमत पट्टा!

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा... काय आहे किंमत पट्टा!

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय किरकोळ आरोग्य विमा व्‍यवसाय क्षेत्रात अत्यंत वेगाने विस्तारत असणारी व केवळ आरोग्य विमा (स्टँडअलोन) व्‍यवसाय करणारी कंपनी म्हणून नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनीची ओळख आहे. ही कंपनी येत्या गुरुवारी (ता.7) आपल्या आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रत्येकी 10 रुपये फेसव्‍हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 70 रुपये ते 74 रुपये असा प्राईस बँड निश्‍चित केलेला आहे.

2024 आर्थिक वर्षात कंपनीच्या ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम इंकम अर्थात जीडीपीआयच्या आधारे ही कंपनी देशात सर्वात वेगाने व्‍यवसाय विस्तारणारी कंपनी ठरली आहे. नीवा बुपा कंपनीची आपली आयपीओ विक्री ऑफर गुरुवारी (ता.7) सुरु होणार असून, सोमवारी (ता.11) ही विक्री बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 200 समभागांच्या लॉटसाठी व त्यापुढे 200 समभागांच्या पटीत अर्ज बीड अर्ज करु शकतील.

हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!

आयपीओमध्ये 800 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इश्यूचा व बुपा सिंगापूर होल्डिंग्स पीटीई लिमिटेड फेटल टोन एलएलपी कंपनीकडून 1400 कोटी रुपयांच्या ऑफर ऑफ सेलचा समावेश असणार आहे. कंपनी आपल्या या आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेपैकी 1500 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम भांडवली पाया मजबूत करण्यासाठी तसेच आपली पतदारिता (सॉल्व्‍हन्सी) पातळी वाढवण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतुंसाठी उपयोगात आणणार आहे.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये नीवा बुपा कंपनीने एकूण 54.94 दशलक्ष रुपये ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम (जीडीपीआय) उत्पन्न मिळवले होते. त्याआधारे देशात स्टँड अलोन हेल्थ इंश्युरन्स म्हणजे केवळ आरोग्य, अपघात व प्रवास विमा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तिसरी मोठी विमा कंपनी व दुसऱ्या क्रमांकाची वेगाने विस्तारणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान वार्षिक 41.37 टक्के दराने वाढ साध्य केली असून, ही वाढ एकूण विमा उद्योगाच्या सरासरी वाढीच्या दुप्पट आहे.

हे देखील वाचा – हिरो मोटोकॉर्पची दिवाळी जोरात, सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल!

कंपनीची आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारा करण्यात आली आहे. त्यानुसार अर्हता प्राप्त संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) गुंतवणूकदारांसाठी प्रमाणानुसार 75 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, ॲक्सिस कपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड व मोतीलाल ओसवाल इनव्‍हेस्टमेंट ॲडव्‍हायझर्स लिमिटेड या कंपन्यांनी नीवा बुपा कंपनीच्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम पाहिले आहे. तर केफिन टेक्नालॉजिज लिमिटेड कंपनीने आयपीओ रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी स्विकारली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Golden opportunity for investors neeva bupa health insurance company ipo will open soon price band

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • Initial Public Offering
  • IPO

संबंधित बातम्या

४ IPO लाँच करण्यात येणार! Groww च्या IPO वर सगळ्यांची नजर
1

४ IPO लाँच करण्यात येणार! Groww च्या IPO वर सगळ्यांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.