विमान प्रवाशांना दिलासा! आता विमानतळावर स्वस्तात मिळणार पाणी, चहा, कॉफी!
विमान प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमती ठरवण्याच्या संदर्भातील विमान कंपन्यांना असणाऱ्या अधिकारांच्या नियमात बदल करण्यात आला आहे. परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास व्हावा याकडे सरकारचे लक्ष आहे. दरम्यान, सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता विमान कंपन्यांना 24 तास अगोदर विमान भाड्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. पूर्वी 24 तास अगोदर विमान कंपन्यांना भाड्याच्या संदर्भात बदल करण्याचा अधिकार होता.
नेमका नियमात काय केला बदल?
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत हवाई भाड्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सामान्यतः सरकार हवाई भाडे नियंत्रित करत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा, विशेषत: जेव्हा हवाई प्रवासी वाहतूक जास्त असते. तेव्हा, वाढत्या भाड्याच्या बाबतीत सरकार हस्तक्षेप करते, जेणेकरून भाडे जास्त वाढवले जावू नये. आतापर्यंत विमान कंपन्या प्रवासाच्या 24 तास आधी भाडे वाढवू किंवा कमी करु शकत होत्या, असा नियम होता. पण आता हा नियम हटवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाच्या काही तास आधीही तिकीट खरेदी केले असल्यास, त्याची किंमत प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी होती तशीच राहणार आहे.
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
हवाई भाडे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जाऊ नये यावर लक्ष
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राज्यसभेत सांगितले आहे की, हवाई भाडे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जाऊ नये. यावर मंत्रालय लक्ष ठेऊन आहे. नायडू यांनी सभागृहाला सांगितले आहे की, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हवाई प्रवास स्वस्त झाला आहे. सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किमतीही तुलनेने कमी झाल्या आहेत.
विमान कंपन्यांना भाडे ठरवण्याचा अधिकार पण…
हवाई प्रवासाच्या तिकिटांच्या किंमती निश्चित करण्याचा अधिकार विमान कंपन्यांना स्वतःला देण्यात आला आहे. जेणेकरुन ते त्यांच्या ऑपरेशनल गरजेनुसार तिकिटांच्या किमती निश्चित करू शकतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या मार्गावर कमी प्रवासी असतील आणि ऑपरेशनल खर्च जास्त असेल, तर एअरलाइन्स भाडे वाढवून त्यांचे नुकसान वाचवू शकतात. पण अतिरीक्त भाडे वाढ केल्यास सरकारचे देखील लक्ष असेल असे सांगण्यात आले आहे.
विमान प्रवासातही फ्लेक्सी फेअर सिस्टीम लागू करण्यात आली असून, त्यानुसार विमान कंपन्या मागणीनुसार भाडे वाढवू शकतात. प्रवासाची वेळ जवळ येताच भाडे वाढत जाते. सरकारने कोणतीही कॅप लावलेली नाही पण विमान कंपन्यांना निश्चितपणे तिकिटांच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.