सरकरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ, आता पगार किती रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
DA Hike Marathi News: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक m बातमी समोर महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील लाखो कुटुंबांसाठी दिलासा देणारा आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्यदिनापूर्वी ही घोषणा करून शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे
सातवा वेतन आयोग नुसार केंद्र सरकारने लागु केलेले 02 टक्के वाढीव डी.ए राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने जानेवारी 2025 पासुन केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 02 टक्के वाढ लागु केली आहे. त्या अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ लागु होणार आहे.
जून तिमाहीच्या कमकुवत निकालांमुळे व्होल्टासचा शेअर कोसळला, मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 02 टक्के डी.ए वाढीमुळे एकुण डी.ए हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निमसरकारी, इतर पात्र असणारे अधिकारी आणि कर्मचारी व राज्य पेन्शन धारक अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना या वाढीव डी.ए. चा लाभ मिळणार आहे.
हा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जानेवारीपासूनचा महागाई भत्त्यातील फरकाची रक्कम जमा केली जाईल. अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?