Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, वाचा… संपुर्ण बातमी?

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय पदावरील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. त्यामुळे आता ही गुगलमधील मोठी नोकरकपात मानली जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 21, 2024 | 05:22 PM
गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, वाचा... संपुर्ण बातमी?

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, वाचा... संपुर्ण बातमी?

Follow Us
Close
Follow Us:

गुगल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय पदावरील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. यामध्ये संचालक, उपाध्यक्ष अशा मोठ्या पदांवर असलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे आता ही गुगलमधील मोठी नोकरकपात मानली जात आहे.

या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येणार

सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलने गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत आता कंपनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. या पदांमध्ये व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. गुगलच्या मते, काही पोझिशन्स वैयक्तिक कंट्रिब्युटरमध्ये बदलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही पोस्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत. गुगलने गेल्या दोन वर्षांत अनेक मोठी पावले उचलली आहेत. जेणेकरून कंपनी अधिक प्रभावी होऊ शकेल. यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.

गुगलने पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कारण गुगलच्या एआय स्पर्धक ओपन एआयने नवीन उत्पादने लाँन्च केली आहेत. याचा परिणाम गुगलच्या शोध व्यवसायावर होत आहे. ओपनएआय लक्षात घेऊन गुगलने त्याच्या मुख्य उत्पादनात जनरेटिव्ह एआय वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. कंपनीने काही नवीन एआय उत्पादने देखील लॉन्च केली आहेत. यात नवीन एआय व्हिडिओ जनरेटर आणि नवीन जेमिनी मॉडेल्सचाही समावेश आहे.

‘या’ आयपीओच्या जीएमपीची कमाल; लिस्टिंगच्या दिवशीच होणार तुमचे पैसे दुप्पट!

मे 2024 मध्येही गुगलने केली होती नोकर कपात

मे 2024 मध्येही गुगलने आपल्या कोअर टीममधून 200 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या इतर देशांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्या. कॅलिफोर्नियातील गुगलच्या अभियांत्रिकी टीममधून सुमारे 50 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गुगलने अचानक नोकर कपातीच्या निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

टेस्लाने वर्षभरात केली मोठी नोकरकपात

टेस्लाने या वर्षी नोकऱ्या कपातीच्या दोन फेऱ्यांची घोषणा केली. सगळ्यात पहिल्यांदा 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या सुपरचार्जिंग टीमसह आणखी शेकडो कर्मचारी कामावरून काढून टाकले. सीईओ एलॉन मस्क यांनी काल रात्री अधिकाऱ्यांना दिलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, उत्कृष्ट, आवश्यक आणि विश्वासार्ह चाचणी उत्तीर्ण न होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीदेखील काढून टाकले जातील. ब्लूमबर्गने अहवाल दिला की, टेस्लाची एकूण हेडकाउंट कपात 20 टक्के किंवा 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.

Web Title: Google job cut news google big decision will lay off 10 percent of employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 05:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.