फोटो सौजन्य - Social Media
हे जग स्पर्धेचे आहे. येथे बहुतेक जण मनमारून कामे करत असतात. या जगात प्रत्येकाला हवं ते मिळत नाही. हव्या त्या क्षेत्रात कामे करता येत नाही. याला हे स्पर्ध्येचे वातावरणही जबाबदार आहे. तसेच वाढत्या गर्दीमुळे कामात योग्य तो मोबदलाही मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी अनेक तरुण व्यवसाय क्षेत्राकडे वळत आहेत. व्यवसाय क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आधी पैसे ओतावे लागतात. हे ही तितकेच खरे आहे. परंतु, यासाठी भांडवल आणायची कुठून? असा प्रश्न प्रत्येपक व्यावसायिकाला सुरुवातीला पडतो. जर तुम्हालाही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवायचे आहे. परंतु, पुरेशी भांडवल नाही आहे. तर टेन्शन नॉट! भारत सरकारच्या या योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता आणि व्यवसाय क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या योजनांबद्दल:
स्टार्टअप इंडिया
भारतातील तरुणांना व्यवसाय क्षेत्रात करिअरची सुरुवात करून देण्यासाठी आणि त्याच्या स्टार्टअपला बळ देण्यासाठी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया या योजनेला सुरुवात केली होती. मुळात, या योजनेच्यता माध्यमातून स्टार्टअपला टॅक्समध्ये दिलासा मिळतो. स्टार्टअपला परवाना काढण्यातही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. अगदी सोप्या प्रक्रियेमध्ये परवाना काढता येतो. स्टार्टअप इंडिया योजनेच्या अंतर्गत देशात अनेक स्टार्ट अप तयार झाले आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेची अमलबजावणी केली आहे. या योजनेचा लाभ अनेक छोट्या व्यावसायिकांना होत आहे. ही योजना व्यवसायाचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच पाया उभा करण्यासाठी व्यावसायिकांना बळ देते. कोणत्याही गॅरेंटी शिवाय कर्ज पुरवण्यात येते. हे कर्ज १ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत असू शकते.
आत्ननिर्भर भारत अभियान
देशातील प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत ही योजना भारत सरकारच्या महत्वाच्या योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत भारतीय सरकारने मोठा वित्तीय पॅकेज जाहीर केला होता. हा वित्तीय पॅकेज २० लाख कोटी रुपयांचा होता. या पॅकेजच्या माध्यमातून व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्र आणि इतर क्षेत्रातील लोकांना वित्तीय बळ देण्यात येत आहे.
या योजनांचा बहुतेक भारतीयांनी फायदा घेतला आहे आणि आपल्या व्यावसायीक क्षेत्रातील प्रवासाला गती दिली आहे. जर तुम्ही या क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य बनवू इच्छित तर नक्कीच या योजनांचा लाभ घ्या आणि तुमच्या व्यवसायाला आणखीन बळ द्या. a