डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ
डिसेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात मोठी वाढ दिसून आली आहे. 1 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 7.3 टक्क्यांनी वाढून, 1.77 लाख कोटी रुपये झाले आहे. जे डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.65 लाख कोटी रुपये होते.
सलग 10 व्यांदा जीएसटी संकलन 1.77 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक
डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी रुपयांचा हा आकडा सलग दहाव्यांदा 1.7 लाख कोटी रुपयांच्या अधिक जीएसटी संकलन दर्शवतो. तथापि, आणखी एक सत्य हे आहे की, एप्रिल 2024 साठी 2.1 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनामागे आहे. त्याच वेळी, जीएसटीची ही वाढ देखील गेल्या 3 महिन्यांतील सर्वात कमी आहे. मात्र, मागील तिमाहीपेक्षा जीएसटी संकलन चांगले झाले आहे.
सेबीने सायबर सुरक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीची मुदत वाढवली; ही असेल शेवटची मुदत
गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीत जीएसटी संकलन चांगले
ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मधील सरासरी जीएसटी संकलन पाहिल्यास, ते 1.82 लाख कोटी रुपये झाले आहे. तर मागील तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान, सरासरी जीएसटी संकलन 1.77 लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी तुलना केल्यास, हे जीएसटी संकलन 8.3 टक्के अधिक आहे.
बॅंकेत महत्त्वाचे काम आहे? मग… जानेवारी महिन्यातील ‘ही’ सुट्ट्यांची यादी वाचाच…
नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वाढ
दरम्यान, गेल्या नोव्हेंबर महिन्यात देखील जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली होती. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 14.57 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात 1.82 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. ऑक्टोबरमध्ये सकल जीएसटी संकलन 9 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींहून अधिक झाले होते. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 33,821 कोटी रुपये, राज्य जीएसटी 41,864 कोटी रुपये, एकात्मिक आयजीएसटी रुपये 99,111 कोटी आणि उपकर 12,550 कोटी रुपये होते.