Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एचडीएफसी लाइफकडून 11 टक्‍के मार्केट शेअरची नोंद, नवीन बिझनेस प्रीमियममध्‍ये 31 टक्‍क्‍यांची वाढ!

एचडीएफसी लाइफला शाश्‍वतता व जबाबदार शासनाप्रती कटिबद्धतेसाठी सन्‍मानित केले जात आहे. एचडीएफसी लाइफच्‍या एसअँडपी ग्‍लोबल ईएसजी स्‍कोअरमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. बॅंक प्रादेशिक विमा कंपन्‍यांपैकी एक म्‍हणून प्रमाणित आहोत. आमचे एमएससीआय ईएसजी रेटिंग देखील 'ए' श्रेणीपर्यंत अपग्रेड करण्‍यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 16, 2024 | 03:49 PM
एचडीएफसी लाइफकडून 11 टक्‍के मार्केट शेअरची नोंद, नवीन बिझनेस प्रीमियममध्‍ये 31 टक्‍क्‍यांची वाढ!

एचडीएफसी लाइफकडून 11 टक्‍के मार्केट शेअरची नोंद, नवीन बिझनेस प्रीमियममध्‍ये 31 टक्‍क्‍यांची वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

एचडीएफसी लाइफच्‍या संचालक मंडळाने ३० सप्‍टेंबर २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या सहामाहीसाठी स्‍वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्‍वीकारला आहे. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्‍ये मोठी वाढ केली असून, सकारात्‍मक गती राखली आहे. नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक एपीई) प्रबळ ३१ टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली आहे.

काय आहेत ठळक वैशिष्‍ट्ये

– उच्‍च-स्‍तरीय वाढ : नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक एपीई) प्रबळ ३१ टक्‍के वाढीची नोंद केली आहे. ज्‍याला विक्री करण्‍यात आलेल्‍या पॉलिसी आणि संतुलित उत्‍पादन संयोजनामध्‍ये २२ टक्‍के वाढीचे पाठबळ मिळाले आहे.
– मार्केट शेअर : खाजगी क्षेत्र मार्केट शेअर (वैयक्तिक डब्‍ल्‍यूआरपी) ६० बीपीएसने वाढून, १६.३ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. ज्याद्वारे एकूण मार्केट शेअर सर्वोच्‍च ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.
– नवीन व्‍यवसायाचे मूल्‍य (व्‍हीएनबी) १७.४ टक्‍क्‍यांनी वाढून १,६५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. ज्‍यामधून लाभदायी व्‍यवसायावरील फोकस दिसून येतो.
– अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) : एयूएम ३० सप्‍टेंबर २०२४ रोजी ३.२५ लाख कोटी रूपये राहिले. ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत २३ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.
– सातत्‍यता : १३ व्‍या व ६१ व्‍या महिन्‍याचे सातत्‍यता प्रमाण अनुक्रमे ८८ टक्‍के आणि ६० टक्‍क्‍यांपर्यंत सुधारले आहे. ज्‍यामुळे मागील वर्षाच्‍या तुलनेत मटेरिअलमध्‍ये अनुक्रमे १२० बेसिस पॉइण्‍ट्स व ७३० बेसिस पॉइण्‍ट्सची वाढ झाली आहे. यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्‍न होण्‍यासोबत त्‍यांना कायम ठेवण्‍याची क्षमता दिसून येते.
– एम्‍बेडेड व्‍हॅल्‍यू (ईव्‍ही) ने तिमाहीदरम्‍यान ५०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा पार करण्‍यासोबत ईव्‍हीवरील कार्यरत परताव्‍यामध्‍ये १६.० टक्‍क्‍यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारक आणि शेअरधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्‍य नि‍र्मिती दिसून येत आहे.
– आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत ९११ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्‍यात आला. ज्‍यामध्‍ये वार्षिक १५ टक्‍के वाढीची नोंद करण्‍यात आली आहे.
– सॉल्वन्सी रेशिओ १८१ टक्‍के राहिला आहे. जो नियामक थ्रेशोल्‍ड १५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त होता. ९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी १,००० कोटी रूपयांच्‍या अधीनस्‍थ कर्ज वाढीनंतर सॉल्वन्सी १९२ टक्‍के राहिले आहे.
– एचडीएफसी पेंशन फंड मॅनेजमेंट एचडीएफसी लाइफची पूर्णत: मालकीची उपकंपनी आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी पेंशन फंड मॅनेजर आहे. या कपंनीने आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत असेट्स अंडर मॅनेजमेंटमध्‍ये १ लाख कोटी रूपयांचा टप्‍पा गाठत मोठी उपलब्‍धी संपादित केली आहे.

हे देखील वाचा – शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; केंद्रिय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी!

मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे विधान

एचडीएफसी लाइफच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्‍हणाल्‍या आहे की, ”खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील प्रबळ वाढ कायम ठेवली आहे. तसेच आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्‍त प्रीमियम बेसिसमध्‍ये अनुक्रमे २४ टक्‍के आणि २१ टक्‍के वाढीची नोंद केली. याच कालावधीदरम्‍यान बॅंकेने २८ टक्‍क्‍यांची आणि २ वर्ष सीएजीआर बेसिसवर १९ टक्‍क्‍यांची वाढ करत खाजगी क्षेत्राला मागे टाकले आहे.

१ ऑक्‍टोबर २०२४ रोजीच्‍या सुधारित नियमनांचे पालन करत ४० हून अधिक टॉप उत्‍पादने यशस्‍वीरित्‍या रिलाँच केली आहेत. ज्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये जवळपास ९५ टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे. तसेच बॅंक तिमाहीदरम्‍यान इतर उत्‍पादने देखील रिलाँच करणार आहे. नवीन उत्‍पादन नियमनांशी संलग्‍न होण्‍याकरिता तीन महिन्‍यांचा अतिरिक्‍त कालावधी देण्‍यासाठी आम्‍ही नियामकांचे आभार व्‍यक्‍त करते. असेही त्यांनी म्हटले आहे.

आम्‍ही शाश्‍वत विकासाला चालना देण्‍यावर आणि प्रमुख विभागांमधील आमचे नेतृत्‍व अधिक प्रबळ करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्‍ही सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासोबत गतीशील बाजारपेठेत स्थिर राहण्‍याची खात्री घेण्‍यासाठी ग्राहक-केंद्रित इनोव्‍हेशन्‍समध्‍ये गुंतवणूक करत राहू. आम्‍हाला भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्‍य देण्‍याप्रती आमच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे. तसेच आम्‍ही गतीशीलता व स्थिरतेसह बदलत्‍या बाजारपेठेत स्थितीशी जुळवून घेत राहू.” असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Hdfc lifes market share increased by 11 percent new business premium increased by 31 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 03:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.