
देशातील मोठा उद्योग समुह असणाऱ्या हिंदुजा ग्रुपच्या (Hinduja Group) हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर तब्बल 2500 करोड रुपये कर चोरी चा आरोप करण्यात आला आहे. आयकर विभागाकडून 9 महिने करण्यात आलेल्या चौकशीनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये हा आरोप लावण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार, आयकर विभागाने त्यांच्या अंतर्गत अहवाल या महिन्यामध्ये सादर केला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून आयकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. या तपासादरम्यान, आयकर विभागाला असे आढळून आले की हिंदुजा ग्लोबल सोल्युशन कंपनीने कर चुकवण्यासाठी तोट्यात चालणाऱ्या कंपनीचे विलीनीकरण केले तर, हेल्थकेअर व्यवसाय नफ्यामध्ये विकला. असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Betaine BV हा हिंदुजा ग्लोबल सॉल्यूशसचा हेल्थकेअर व्यवसाय पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांना विकला होता. जो बेयरिंग प्रायव्हेट इक्विटी एशियाशी निगडीत फंड आहे. नंतर तोच फंड हिंदुजा ग्रुपने हिंदुजा ग्लोबल सोल्युशंसच्या डिजिटल मीडिया एंड कम्युनिकेशन बिझनेस युनिट NXT डिजिटलमध्ये विलीन करण्यात आले. आयकर विभागाने म्हटले आहे की NXT डिजिटल ही तोट्यात चालणारी कंपनी होती आणि त्यामध्ये कंपनीचे केले गेले विलीनीकरण हे केवळ कर वाचविण्यासाठी करण्यात आले होते.
मीडीया रिपोर्टनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदुजां कंपनीशी निगडीत तपास पूर्ण झाला आहे. या तपासामध्ये निष्पन्न झाले की, कंपनीच्या विलीनीकरणाचा उद्देश हा केवळ कर वाचविणे होता. आयकर विभागाने नोव्हेंबर 2023 मध्ये या संदर्भात कंपनीच्या जागेचे सर्वेक्षणही केले होते.
विलीनीकरण नियम कायद्यानुसार कंपनीचे म्हणणे
कंपनीकडून मात्र सांगितले जात आहे की यासंबंधी आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नाही आहे. कंपनीचे मत आहे की विलिनीकरण हे पूर्णपणे नियम आणि कायद्यानुसार करण्यात आले होते. आयकर विभागाच्या गेल्यावर्षाच्या सर्वेक्षणामध्येही विलीनीकरणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी कंपनीने त्यासंंबंधी योग्य उत्तर दिले होते आणि कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर आतापर्यंत याबाबत कंपनीकडे कोणतीही नोटीस आली नाही आहे.
हिंदुजा समुहाकडे हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स सह हिंदुजा लेलँड फायनान्स, हिंदुजा बँक (स्वित्झर्लंड), अशोक लेलँड आणि हिंदुजा टेक लिमिटेड यासारख्या संस्था देखील आहेत.