सुरक्षित खातेपुस्तकामुळे मालमत्ता पुस्तकामध्ये वाढ; एनआयएममध्ये 9.2 टक्के वाढ - उज्जीवन बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीच्या आपल्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत एनआयआय १५ टक्के (वार्षिक) / ०.२ टक्के (तिमाही-ते-तिमाही) वाढीसह ८४४ कोटी रूपयांवर पोहोचले आहे. एनआयएम ९.२ टक्के राहिले आहे. खर्च-उत्पन्न प्रमाण ६० टक्के राहिले आहे. पीपीओपी ४६१ कोटी रूपये राहिले आहे. तर आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत पीएटी (करोत्तर नफा) २३३ कोटी रूपये राहिला आहे. अशी माहिती उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने जारी केली आहे.
काय म्हटलंय संजीव नौटियाल यांनी?
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल यांनी सांगितले आहे की, “उज्जीवन नेहमी प्रबळ राहिली आहे आणि उद्योगामधील अडथळ्यांमधून यशस्वीपणे नेव्हिगेट केले आहे. तसेच आमचा स्थिर व्यवसाय मॉडेल आणि प्रत्यक्ष स्थितीबाबत समजणे आम्हांला अशा समस्यांना ओळखण्यासोबत आत्मविश्वासाने त्यांचे व्यवस्थापन करण्यास उत्तमरित्या सक्षम केले आहे.
हे देखील वाचा – दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!
आमच्या पूर्वीच्या परस्परसंवादांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही वाढत्या कर्जामुळे देशभरात तणावपूर्ण स्थितीचा सामना केला आहे. म्हणून आम्ही मायक्रोफायनान्स क्षेत्रात विकासाच्या संदर्भात सावध दृष्टिकोन विकसित केला आहे आणि मालमत्ता दर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही अधिक सतर्क बनलो आहोत.” असेही त्यांनी म्हटले आहे.
सुरक्षित खातेपुस्तकामुळे मालमत्ता पुस्तकामध्ये वाढ
तिमाहीसाठी एनआयएम ९.२ टक्के होते, ज्याला ७.५ टक्क्यांवर स्थिर असलेल्या फंड खर्चाचे पाठबळ मिळाले. तिमाहीसाठी पीपीओपी ४६१ कोटी रूपये होते आणि तिमाहीसाठी पीएटी (करोत्तर नफा) २३३ कोटी रूपये होता. आमच्या मायक्रो फायनान्स बिझनेस बुकच्या प्रभावाच्या कारणास्तव मागील तिमाहींच्या तुनलेत अत्यंत कमी वाढ आणि वाढत्या क्रेडिट खर्चामुळे हा प्रभाव दिसून आला आहे. आम्हाला आमच्या व्यवसायावर विश्वास आहे, जेथे आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणत, सुरक्षित मालमत्ता पोर्टफोलिओ वाढवत, आमच्या क्षमतांचा फायदा घेत आणि जनतेसाठी मोठ्या प्रमाणात स्वीकृत बँक म्हणून स्वत:ला सादर करत ‘बॅक ऑफ द फ्यूचर’ ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. असेही संजीव नौटियाल यांनी सांगितले आहे.