वाढत्या महागाईतच भाजीपाल्याच्या दरात वाढ; टोमॅटो, कांदा, बटाट्याचे दर भिडलेत गगनाला!
भारतात चलनवाढीचा दर सातत्याने वाढत असून, ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या ६ टक्क्यांच्या वर गेला आहे. प्रामुख्याने ऑक्टोबरमध्ये देशातील किरकोळ महागाई दर हा 6.21 टक्के इतका नोंदवला गेला आहे. जी 14 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. ऑगस्ट 2023 नंतर पहिल्यांदाच किरकोळ महागाईने आरबीआयच्या सहनशीलतेची पातळी ओलांडली गेली आहे. खाद्यपदार्थ विशेषत: भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने देशात महागाईचा दर वाढला आहे.
महागाई 15 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर
ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या महागाईचा 15 महिन्यांतील उच्चांक हा 10.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्येही सर्वाधिक वाढ विशेषत: टोमॅटो, बटाटा आणि कांद्याच्या किमतीत झाली आहे.
हे देखील वाचा – चार रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये; गुंतवणूकदार मालामाल!
महागाईबाबत महत्त्वाचे मुद्दे
– यंदा टोमॅटोच्या दरात 161 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
– बटाट्याच्या दरात वार्षिक आधारावर 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
– यंदा कांद्याचे दर 52 टक्क्यांनी वाढले आहेत.
– वर्षाच्या सुरुवातीला कोबीचे दर 21 टक्के होते. ते आता 31 टक्के झाले आहेत.
घाऊक महागाईतही मोठी वाढ
घाऊक महागाई दरातही लक्षणीय वाढ दिसून आली असून, ती 2.36 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यातही खाद्यपदार्थांच्या महागाई दरात 11.59 टक्के महागाईचा दर वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे.
पुरवठा बाजू आणि पुरवठा साखळी समस्या
पुरवठा साखळीच्या समस्येवर तोडगा न निघणे आश्चर्यकारक असून, भाजीपाला मंडईत मोठे व्यापारी असूनही पुरवठ्याच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. हे अधोरेखित करणारे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा चांगला असतो. असे असतानाही टोमॅटो, कांदा यांसारख्या नित्य भाजीपाल्याचे भाव उतरत नसतील तर ही चिंतेची बाब आहे.
हे देखील वाचा – ‘या’ बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ; वाचा… काय आहे बॅंकेचे नवीन व्याजदर!
आरबीआय समोरही अनेक आव्हाने
सध्या भाजीपाला, विशेषत: बटाटे, कांदा, टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर नवनवीन वादही होत आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील व्याजदरात कपात करण्याचे आव्हान देशाच्या मध्यवर्ती बँक आरबीआयच्या गव्हर्नरसमोर आहे. जे यंदाही त्याच पातळीवर राहिले आहे.