चार रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये; गुंतवणूकदार मालामाल!
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भारतीय शेअर बाजारात सध्या चढउताराचे सत्र आहे. त्यात काही दिग्गज शेअरला फटका बसला आहे, तर बाजारात असे काही स्टॉक आहेत जे गुंतवणूकदारांना नफा देण्यात अग्रेसर आहेत. त्यात या स्मॉलकॅप कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 700 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 4 रुपये ते 32.50 रुपयांपर्यंत उसळी घेत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकची एलआयसीमध्ये पण वाटा आहे.
एटीव्ही प्रोजेक्टसची कमाल
एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीचा शेअर असाच मल्टिबॅगर ठरला आहे. या स्मॉलकॅप स्टॉकने गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात मोठा परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वी हा शेअर 4 रुपयांना होता. गेल्या पाच वर्षात हा शेअर मजल दरमजल करत 32.50 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
हे देखील वाचा – ‘या’ बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ; वाचा… काय आहे बॅंकेचे नवीन व्याजदर!
5 वर्षांत असा वाढला भाव
एटीव्ही प्रोजेक्ट्सचा शेअर गेल्या एका महिन्यात 10 टक्के आपटला आहे. पण गेल्या सहा महिन्यातील रेकॉर्ड जोरदार आहे. 6 महिन्यापूर्वी हा शेअर 23.90 रुपयांवर होता. तो आता 32.50 रुपयांवर आला. म्हणजे सहा महिन्यात तो 35 टक्के उसळला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 15.25 रुपयांवर होता. आता तो 32.50 रुपयांवर आला आहे. या शेअरने या काळात 110 टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणूकदारांचा फायदा
गेल्या एका वर्षात हा स्टॉक 14.60 रुपयांहून 32.50 रुपयांपर्यंत आला आहे. गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा दिला. तर 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आता 8 लाख रुपये इतकी झाली असती.
एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर त्याला मोठा फटका बसला असता. त्याची रक्कम कमी होऊन 90,000 रुपयांवर आली असती. तर 6 महिन्यांपूर्वी त्याने गुंतवणूक केली असती तर या एक लाख रुपयांचे आता 1.35 लाख रुपये झाले असते. जर एखाद्याने 2023 च्या अखेरीस 1 लाख रुपये गुंतवले असते. तर ही रक्कम आज 2.10 लाख रुपये झाली असती. या कंपनीत देशातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे. एलआयसीकडे 9,95,241 शेअर आहेत. एलआयसीचा हा वाटा 1.87 टक्के इतका आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)