Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना बळ! 2029 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – आयएमएफ

भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशाला तिसरी सर्वात मोठी बनवण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. याबाबत आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) देखील आपला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 14, 2024 | 07:12 PM
पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना बळ! 2029 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - आयएमएफ

पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना बळ! 2029 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - आयएमएफ

Follow Us
Close
Follow Us:

नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर, देशाला तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोदी सरकारचा हा कार्यकाळ २०२९ पर्यंत चालणार आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) २०२९ पर्यंत भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

२०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल 6.44 ट्रिलियन डॉलरची

जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश आहेत. तर येत्या पाच वर्षात भारत जर्मनी आणि जपान या देशांना पछाडत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. असे आयएमएफने म्हटले आहे. तेव्हा २०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 6.44 ट्रिलियन डॉलर मूल्याची असणार आहे. तर जर्मनीची अर्थव्यवस्था ही 5.36 ट्रिलियन डॉलर आणि जपानची अर्थव्यवस्था ही 4.94 ट्रिलियन डॉलर असणार आहे. भारत सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.

हेही वाचा : एक ग्लास पाणी मागितले, टेकवले 1,260 रुपयांचे बिल; अमेरिकी आदरातिथ्याचा मुद्दा बनला चर्चेचा विषय!

जर्मनी, जपानच्या अर्थव्यवस्थांच्या संघर्ष

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीनुसार, २०२९ मध्ये अमेरिका 34.95 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था कायम राहणार आहे. याशिवाय चीन हा देखील 24.84 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे. तर जर्मनी आणि जपान या देशांची अर्थव्यवस्था मात्र संघर्ष करताना दिसून येणार आहे. सध्याच्या स्थितीतच जपानच्या केंद्रीय बँकेकडून व्याजदरात वाढ केली जात आहे. असेही आयएमएफने म्हटले आहे.

चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संकटात

याशिवाय मागील दोन दशकांपासून चीनची अर्थव्यवस्था देखील विविध पातळीवर संघर्ष करताना दिसून येत आहे. चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संकटात सापडले आहे. या क्षेत्राचा चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल ३० टक्के हिस्सा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामुळे चीनमधील बँकाच्या अर्थकारणावर देखील मोठा परिणाम झाला आहे. याउलट भारतीय अर्थव्यवस्था प्रत्येक पातळीवर वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीनुसार, पुढील दोन ते तीन वर्ष भारत हा सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे.

Web Title: India to become third largest economy in 2029 says imf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 07:12 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.