
मुंबई : इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (IIL) या आघाडीच्या लस उत्पादकांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या इंडियन कौन्सिल ऑफ ॲक्वाकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत भागीदारी केली. या भागीदारींच्या माध्यमातून गोड्या पाण्यातील माशांमध्ये जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर व्यावसायिक पातळीवर लस विकसित करण्यात येणार आहे.
हौदाचे व्यवस्थापन आणि मासे किंवा शिंपल्यांच्या आतड्यांच्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रा असलेल्या ॲक्वाकल्चर आरोग्य बाजारपेठेसाठी उत्पादने लाँच करून ऑक्टोबर २०२२ मध्ये आयआयएलने ॲक्वा बिझनेसमध्ये पदार्पण केले.
२०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९.८ अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर वाढणाऱ्या प्रथिनांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ॲक्वाकल्चर क्षेत्राचा मोठा वाटा असणार आहे.
जागतिक पातळीवर भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्यउत्पादक आहे आणि भारतातील ६५% मासेमारी अंतर्देशीय फिशरीज आणि मत्स्यपालनाच्या माध्यमातून होते. या क्षेत्रात भारतातील २ कोटी ८० लाख लोकांना, विशेषतः वंचित व दुर्बल गटांमधील लोकांना रोजगार मिळतो. २०२१-२२ या कालावधीत मत्स्योत्पादन क्षेत्रातून ७.७६ अब्ज डॉलर इतके निर्यात उत्पन्न प्राप्त झाले.
या प्रसंगी इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकी संचालक डॉ. के. आनंद कुमार म्हणाले, “आयआयएलने अनेक नावीन्यपूर्ण पशुवैद्यकीय लसींची निर्मिती केली. यात पोर्साइन सायस्टिसरकॉसिस लस, FMD+HS+BQ कॉम्बिनेशन लस आणि थिलेरिया लसीचा समावेश आहे. भारतात मत्स्य लस आणणारी आयआयएल ही भारतातील पहिली कंपनी आहे. मत्स्यशेती बाजारपेठेसाठी आम्ही अधिकाधिक उत्पादने बाजारात आणण्यासाठी आणि शिंपले व मत्स्यशेती करणाऱ्यांना उत्पादकता वाढविण्यासाठी व माशांचा विविध आजारांपासून बचाव करण्याचा या कंपनीचा निर्धार आहे.
भारतीय मत्स्योत्पादकांना त्यांच्या मत्स्यशेती यंत्रणेमध्ये येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याचा आयआएलचा प्रयत्न आहे. सीआयएफई दोन इनॅक्टिव्हेटेड जीवाणूजन्य आजारांवरील लसींसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. यापैकी एक आहे कॉलमनरिस आजार, ज्याचा गोड्या पाण्यातील माशांच्या अनेक प्रजातींवर परिणाम होतो. दुसरा आजार आहे एडवर्डसिलॉलिस, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडतात. परिणामी, आर्थिक नुकसान होते. गोड्या पाण्यातील माशांमध्ये हे दोन्ही आजार अत्यंत सामान्यपणे आढळून येतात आणि हे आजार सर्वव्यापी समजले जातात.
इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. प्रियब्रत पट्टनाइक म्हणाले, “आयसीएआर अंतर्गत असलेल्या विविध मत्स्योत्पादन संस्थांकडून तंत्रज्ञान ट्रान्सफरसह लसी व इम्युनोस्टिम्युलंट्स सादर करण्याची आयआयएलची योजना आहे. प्रायोगिक तत्वावर निर्माण केलेल्या अनेक मत्स्य लशींचे व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने मूल्यमापन करण्यात येत आहे. अशा लसी सादर केल्याने रासायनिक किंवा प्रतिजैविकांवर आधारित उपचारपद्धतींचा वापर कमी होण्यावर सकारात्मक परिणाम होईल. परिणामी, तलाव आणि माशांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्या पर्यावरणीय शाश्वत पद्धतींचा सराव करणाऱ्या मत्स्य उत्पादकांकडून प्रतिजैविक प्रतिकार कमी करण्यास मदत होईल.”
आयसीएआर-सीआयएफईचे संचालक आणि कुलगुरू डॉ. सीएन रवीशंकर म्हणाले, “भारतातील नीलक्रांतीला सहाय्य करताना भारतातील पहिले जीवाणू मत्स्य लस विकसित करण्यासाठी सीआयएफई आणि आयआयएल एकत्र आल्याने मला आनंद झाला आहे.
अनेक जीवाणूजन्य, विषाणूजन्य, बुरशीजन्य इतर आजारजन्य घटकांमुळे होणाऱ्या प्रादूर्भावांमुळे भारतातील मत्स्योत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या अँटि-इन्फेक्टिव्ह्ज व इतर पारपंरिक उपाययोजनांचा वापर केला जात आहे व या उपायांना मिश्र यश प्राप्त होत आहे. अँटि-मायक्रोबिअल रेसिस्टन्ससंदर्भात (एएमआर) व्यक्त होणाऱ्या शंका आणि जागतिक व स्थानिक प्लॅटफॉर्मवर रसायनमुक्त उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे या आजारांविरोधात अधिक चांगल्या उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता होती. भारतात सध्या मासांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावावर व्यावसायिक पातळीवर माशांच्या लसी उपलब्ध नाहीत.