फोटो सौजन्य - Social Media
१ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या बजेटकडे लागले आहे, विशेषतः गुंतवणूकदार व शेअर बाजारातील व्यवहारांवर या बजेटचा मोठा प्रभाव राहणार आहे. बजेट सादरीकरणाच्या दिवशी काही क्षेत्र आणि विशिष्ट कंपन्यांवर गुंतवणूकदार विशेष लक्ष ठेवतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.
Capex आणि Infra क्षेत्रात सुधारणा होण्याची अपेक्षा
लोकसभा निवडणुकीनंतरच्या कालावधीत पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि Capital Expenditure (Capex) क्षेत्रात काहीसा मंदावलेला कल पाहायला मिळाला होता. मात्र, या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी सरकार १०% ते १२% वाढीचा खर्च करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्या गुंतवणूकदारांच्या विशेष लक्षात राहणार आहेत.
Road आणि Construction क्षेत्राचा भरभराटीचा अंदाज
रस्ते आणि बांधकाम क्षेत्रालाही यंदाच्या बजेटमधून मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते विकास प्रकल्पांसाठी रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचा खर्च ५% ते ६% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. देशभरात सुरू असलेल्या मोठ्या रस्ते प्रकल्पांमुळे KNR कन्स्ट्रक्शनसारख्या कंपन्यांना थेट फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Power आणि डिफेन्स क्षेत्रावर गुंतवणूकदारांचे लक्ष
Power Sector मध्ये सरकार विशेष लक्ष देईल, अशी शक्यता आहे. मागील वर्षी या क्षेत्रासाठी २०,५०२ कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली होती, जी त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत १६% अधिक होती. यंदा देखील या क्षेत्राला भरीव बजेट मिळण्याची शक्यता आहे. डिफेन्स क्षेत्रासाठी आधुनिकरणावर भर देण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार याकडे लक्ष देत आहेत.
रेल्वे आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्राचा फोकस
रेल्वे मंत्रालयासाठी १५% ते १८% पर्यंत अधिक बजेट वाटप होण्याची अपेक्षा आहे. यामुळे RVNL, BEML आणि IRFC यांसारख्या कंपन्यांना फायदा होईल. याशिवाय नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंझम्प्शन क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा
देशांतर्गत कंझम्प्शन वाढवण्यासाठी सरकार काही धोरणे लागू करू शकते. अशा सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार या २५ शेअर्सकडे विशेष लक्ष देणार आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.