10 डिसेंबरला खुला होणार 'हा' आयपीओ; वाचा... किंमत पट्टा, कितीये लाॅट आकार!
सध्या शेअर बाजारात चांगलाच चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच आता मार्केटिंग सल्लागार कंपनी टॉस द कॉइन लिमिटेडचा आयपीओ 10 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओसाठी 172-182 रुपये प्रति शेअर इतका किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 9.17 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 12 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे.
आयपीओ ९.१७ कोटी रुपयांचा – टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत ९.१७ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ ५.०४ लाख शेअर्सचा पूर्णपणे नवा इश्यू आहे. नारायणन जयन, रेश्मा बुधिया आणि सुधांशु बुधिया हे टॉस द कॉइन लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.
आयपीओचा शेअर प्राइस बँड – टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 172-182 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 600 शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १,०९,२०० रुपये गुंतवावे लागणार आहेत.
नारायण मूर्तींनी खरेदी केले ‘या’ दिवाळखोर उद्योगपतीचे आलीशान घर; किंमत वाचून चक्रावून जाल!
आयपीओचा जीएमपी – अनलिस्टेड मार्केटमध्ये टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचा जीएमपी २०० रुपयांवर आहे, जो आयपीओ प्राईस बँड पेक्षा १०९.८ टक्क्याने जास्त आहे.
कंपनी बद्दल – टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी एक विपणन सल्लागार कंपनी आहे ही कंपनी ग्राहकांना सानुकूल-निर्मित विपणन सेवा प्रदान करते. कंपनी बी2बी टेक कंपन्यांसाठी विपणन सल्ला सेवा पुरवते. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनीला अनेक लहान-मोठ्या तंत्रज्ञान संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव आहे.
टॉस द कॉइन लिमिटेडची आर्थिक कामगिरी – 31 मार्च 2024 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात टॉस द कॉइन लिमिटेडच्या महसुलात 2.49% आणि करोत्तर नफ्यात (पीएटी) 38.39% घट झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 4.38 कोटी रुपये आणि करोत्तर नफा 1.16 कोटी रुपये होता.
आयपीओचा उद्देश – टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर मायक्रोसर्व्हिसेस ऍप्लिकेशनच्या विकासासाठी, नवीन कंपनी कार्यालये उघडण्यासाठी, कंपनीच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूं करणार आहे.
इश्यू स्ट्रक्चर – टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ पैकी 50% हिस्सा क्यूआयबी गुंतवणूकदारांसाठी, 35 % रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 15% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)