Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 45 पैशांत मिळणार 10 लाखांचे सुरक्षा कवच!

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना फक्त 45 पैशांत 10 लाख रुपयांचे कव्हर मिळणार आहे. ही विमा पॉलिसी ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यानंतर एका पीएनआरवर (पीएनआर) प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 06, 2024 | 05:33 PM
IRCTC Insurance Policy Good news for railway passengers 10 lakh security cover will be available in just 45 paise

IRCTC Insurance Policy Good news for railway passengers 10 lakh security cover will be available in just 45 paise

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या नव्या ट्रॅव्हल इंश्युरन्स पॉलिसीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना फक्त 45 पैशांत 10 लाख रुपयांचे कव्हर मिळणार आहे. ही विमा पॉलिसी ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यानंतर एका पीएनआरवर (पीएनआर) प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल.

नेमका कोण घेऊ शकेल लाभ?

आयआरसीटीसीची इंश्युरन्स पॉलिसीचा लाभ केवळ भारतीय नागरिक घेऊ शकतात. विदेशी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ऑनलाईन तिकिट (ई-तिकिट) बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच लाभ घेता येईल. विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रति प्रवाशाला फक्त 45 पैसे मोजावे लागतील. मात्र, एजंट आणि इतर संस्थांच्या माध्यमातून तिकिट बुकिंग केल्यास विमा पॉलिसीचा लाभ घेता येणार नाही. त्याच बरोबर 5 वर्षांखालील मुलांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, 5 ते 11 या वयोगटातील मुलांनी तिकिटासह किंवा विनाआसन बुकिंग केल्यास त्यांना या योजनाचा लाभ मिळू शकतो.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार

कशासाठी किती मिळतील पैसे?

मृतदेह स्थलांतर करताना-
रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना मृतदेह स्थलांतर करण्यासाठी 10 हजार रुपये मिळतील.

वैद्यकीय उपचार खर्च-
रेल्वे अपघातात गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी 2 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळेल.

कायमस्वरुपी किंवा आंशिक अपंगत्त्व आल्यास-
रेल्वे अपघाता कायमस्वरुपी अपंगत्त्व आल्यास 100 टक्के रक्कम मिळते.तसेच आंशिक अपंगत्त्व आल्यास विम्याची 75 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच ही रक्कम 750000 लाख रुपये असू शकते.
मृत्यू ओढवल्यास-
रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाला विम्याची 100 टक्के रक्कम म्हणजे 10 लाख रुपये मिळेल.

हे देखील वाचा – अमेरिकेत ट्रम्प सरकार येताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी; 937 अंकांनी वधारला सेन्सेक्स!

कसा मिळेल विमा कव्हर?

प्रवाशांना एसएमएस आणि ईमेलद्वारे विम्याची माहिती दिली जाईल.
प्रवासी त्यांच्या तिकीट बुकिंग हिस्ट्रीतून पॉलिसी क्रमांक आणि इतर माहिती तपासू शकतात.
विमा कंपनीच्या वेबसाइटवर तिकीट बुक केल्यानंतर नॉमिनीचा तपशील भरावा.
नामनिर्देशन माहिती भरली नसेल तर दाव्याच्या बाबतीत कायदेशीर वारसांना पैसे दिले जातील.
ही विमा पॉलिसी फक्त कन्फर्म आणि आरएसी तिकीट धारकांसाठीच लागू असेल.
प्रवासादरम्यान अपघात किंवा अनपेक्षित घटना घडल्यास प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे.

Web Title: Irctc insurance policy good news for railway passengers 10 lakh security cover will be available in just 45 paise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 05:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.