
'सनफिस्ट पेय'साठी 'आयटीसी'- 'पिझ्झा हट'ची भागीदारी; वाचा... ग्राहकांना काय फायदा होणार
खाद्यपदार्थ क्षेत्रातील दिग्गज ‘पिझ्झा हट’ आणि ‘आयटीसी’ने प्रथमच हातमिळवणी करत भागीदारीची घोषणा केली आहे. याद्वारे ‘पिझ्झा हट’ त्यांच्या खाद्यपदार्थ यादीत (मेनू) सर्वाधिक विक्री होणारी सनफिस्ट शीतपेये डार्क फॅन्टसी मिल्कशेक आणि मँगो स्मूदी समाविष्ट करणार आहेत. गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेवर एकत्रित लक्ष केंद्रित करून, सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या अभिरुचीची पूर्तता करणारा अनोखा अनुभव प्रदान करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
सणासुदीच्या काळात ‘पिझ्झा हट’च्या खाद्यप्रेमी ग्राहकांचे सर्वाधिक आवडते सनफिस्ट शीतपेय या उत्सवाला एक विशेष आयाम देतील. दिवाळीतील स्नेहसंमेलन असो किंवा आगामी सण, हे दोन्ही अनोखे ‘क्युरेट’ केलेले पेय चटकदार जेवणाची चव अधिक वाढवणार आहेत. ‘डार्क फँटसी मिल्कशेक’ हा चॉकलेट प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे आणि सनफिस्ट डार्क फॅन्टसीचा बेल्जियन चॉकलेटबरोबर क्रीमी, मखमली मिल्कशेक अनोखा स्वाद देतो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
मँगो स्मूदीमध्ये पिकलेल्या आंब्याचा गोडवा आणि फळे तसेच मलई यांचे मोहक मिश्रण असते, ज्यामुळे ते उष्ण हवामानात विशेष ट्रीट घेऊ इच्छिणाऱ्यांसाछी हे एकप्रकारे ताजेतवाने करणारे पेय बनते. या अनोख्या मिश्रणांमुळे दोन्ही ब्रँड्सना एकत्रितपणे सर्व वयोगटासाठी वैविध्यपूर्ण चवींची पूर्तता करण्यास मदत होणार आहे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, विशेषत: लहान मुलांना काही ना काही आवडते पदार्थ आणि आनंद मिळण्याची खात्री होईल.
‘पिझ्झा हट इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रोहन पेवेकर याबाबत म्हणाले आहे की, आम्ही ‘आयटीसी’बरोबर भागीदारीद्वारे आमच्या विविध ऑफर्सचा विस्तार करण्यास इच्छुक आहोत. मिल्क शेक आमच्या मेन्यूला आणि आमचे ग्राहक जे क्षण जतन करू इच्छितात, त्यांसाठी अतिशय उत्तम प्रकारे पूरक आहेत. मग ते कामानंतर सहकाऱ्यांसोबत आनंदी राहणे असो, कुटुंब आणि मुलांबरोबर सुखावह असा जेवणाचा आनंद घेणे असो किंवा मित्रांसह आनंदाचे क्षण, प्रसंग साजरे करणे असो. सणासुदीच्या काळात ही उत्पादने बाजारात आणल्याने हे शेअर केलेले अनुभव आणखी खास बनतात, असेही त्यांनी सांगितले आहे.
भागीदारीबद्दल बोलताना, ‘आयटीसी फूड्स’चे उपाध्यक्ष तसेच डेअरी आणि बेव्हरेजेस विभागाचे मुख्य अधिकारी विवेक कुक्कल म्हणाले आहे की, ग्राहकांची प्राधान्ये आमच्या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत आणि ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न असतो. या भागीदारीद्वारे आम्हाला आमची दोन सर्वांत आवडती पेये ऑफर करताना आनंद होत आहे. ही पेय पिझ्झा हट डिशबरोह उत्तम प्रकारे जोडली जातील.’
दोन्ही कंपन्यांमधील हे सहकार्य म्हणजे ग्राहकांना अतुलनीय अनुभव देण्यासाठी आघाडीच्या फूड ब्रँडमधील समन्वयाचे प्रतिबिंब आहे.” ऑक्टोबर २०२४ पासून भारतातील सर्व ‘पिझ्झा हट’ आउटलेटवर सनफिस्ट शीतपेये उपलब्ध होतील, अशी माहितीही कुक्कल यांनी दिली आहे.