कधीकाळी भारताची शान होती 'ही' विमान कंपनी; आज झालीये बर्बाद... वाचा.. तिची खडतर कहाणी!
अलिकडेच 7 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशातील एका आघाडीच्या विमान कंपनीला संपत्ती रद्द करण्याचे किंवा त्यांची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचा (एनसीएलएटी) निर्णय नाकारला. आणि एसबीआय आणि इतर कर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जेट एअरवेज ही आघाडीची विमान वाहतूक कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.
एकेकाळी जेट एअरवेज ही देशातील सर्वोत्तम विमान कंपनी मानली जात होती. हीच बाब लक्षात घेऊन, इतक्या बड्या विमान वाहतुक कंपनीला नेमकी घरघर का लागली. याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…
(फोटो सौजन्य – iStock)
पंजाबमधील संगरूर येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नरेश गोयल यांनी जेट एअरवेज कंपनी सुरू केली. नरेश गोयल यांनी त्यांच्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॅशियर म्हणून काम करण्यापासून ते देशाची यशस्वी एअरलाइन स्थापन करण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांनी पतियाळा येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. त्यानंतरच तो ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करू लागले. त्यांची स्वप्ने उंच असल्याने, त्यांनी परदेशी विमान कंपन्यांशी संपर्क करणे सुरू केले?
हे देखील वाचा – आरबीआयची ‘या’ बॅंकेवर मोठी कारवाई; तुमचे तर खाते नाही ना? वाचा… नेमकं प्रकरण काय?
एअर टॅक्सीपासून केली सुरुवात
जेट एअरवेज 1993 मध्ये एअर टॅक्सी सेवा ऑपरेटर म्हणून सुरू झाली. आणि ती त्वरीत सर्वोच्च दर्जाची आंतरराष्ट्रीय सेवा देणारी भारतातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी बनली. या कंपनीची सुरुवात कुवेत एअरवेज आणि गल्फ एअर यांच्याशी मिळून 20 इक्विटी टक्के भागीदारीसह झाली. जे दोन्ही नंतर व्यवसायातून बाहेर पडले. चेन्नई-कोलंबो मार्गावर 2004 मध्ये त्यांनी परदेशात प्रथम काम सुरू केले.
कंपनी आपल्या सर्वोत्तम काळात 120 पेक्षा जास्त विमाने, अंदाजे 1,300 पायलट आणि एकूण अंदाजे 20,000 कर्मचाऱ्यांसह काम करत आहे. जेट एअरवेजचा यशस्वी आयपीओ 2005 मध्ये आला. द गार्डियनने 2006 मध्ये नरेश गोयल यांच्यावर लिहिले होते की, ते त्यावेळी यशाच्या शिखरावर होते. मात्र, आज हीच कंपनी काठाला आली आहे.
आर्थिक संकटाची सुरुवात 2007 पासून
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जेट एअरवेजवरील आर्थिक संकट हे 2007 साली आले होते. ज्याची सुरुवात गोयलने प्रतिस्पर्धी एअर सहाराला 1,450 कोटी रुपयांना खरेदी केली केले. किंगफिशर एअरलाइन्स आणि कमी किमतीच्या एअरलाइन्स एअर डेक्कन, इंडिगो आणि स्पाइसजेट यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी गोयल यांनी सहाराला खरेदी केले होते, परंतु या करारामुळे जेटला स्पर्धा करण्यापासून रोखले गेले. याशिवाय जेटने विमानाची ऑर्डर दिल्यानंतर उर्वरित आयपीओचे पैसेही असेच वाया घालवले.
कर्जाचा आकडा 7,500 कोटींच्या वर
कोरोना या वैश्विक संकटामुळे 2019 पर्यंत ही कंपनी बंद करण्यात आली. त्यावेळी जेट एअरवेजवरील कर्ज 7,500 कोटींच्या वर गेले होते. त्यानंतर, एसबीआय आणि इतर कर्जदार एअरलाइनविरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसाठी एनसीएलटीकडे गेले. त्यानंतर कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान सारख्या गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आणि एक पुनरुज्जीवन योजना पुढे केली ज्याला 2021 मध्ये NCLT ची मंजुरी मिळाली. मात्र, ही योजनाही यशस्वी होऊ शकली नाही.
2023 पर्यंत, कॅलरॉक-जालान कंसोर्टियम त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नसल्यामुळे जेटच्या पुनरुज्जीवनाच्या आशा मावळत होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जेट एअरवेजच्या दिवाळखोरीची कहाणी संपुष्टात आली असून, मालमत्ता विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा शेअर बाजारातील व्यवहारही ठप्प झाला आहे.