कर्नाटक बँकेत भरती, पदवीधरांना अर्ज करण्याची मोठी संधी, वाचा... शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया!
सध्याच्या घडीला अनेक पदवीधर तरूण नोकरीच्या शोधात आहे. अनेक आपल्या शिक्षणानुसार नोकरी शोधत असतात. त्यामुळे आता तु्म्ही देखील पदवीधर असाल आणि तुम्ही एखाद्या बॅंकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दक्षिणेकडील आघाडीची बॅंक असलेल्या कर्नाटक बॅंकेत मोठी भरती निघाली आहे.
कर्नाटक बँकेने ग्राहक सेवा सहयोगी (सीएसए) च्या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज म्हणजेच 30 नोव्हेंबर असणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.karnatakabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या आयपीओच्या शेअर्सचे आज वाटप होणार, वाचा… सविस्तर माहिती!
काय आहे शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी.
निवड प्रक्रिया :
– ऑनलाइन परीक्षा
– मुलाखत
– वयोमर्यादा
जास्तीत जास्त 26 वर्षे
एससी, एसटी यांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.
सिबिल अपडेट ते तक्रार निवारण; सिबिल स्कोरबाबत आरबीआयचे 6 नवीन नियम माहितीये का?
शुल्क :
सामान्य/अनारक्षित/ओबीसी: रु 700 + GST
SC/ST: रु 600 + GST
पगार:
मूळ वेतन – 24,050 रुपये प्रति महिना.
मेट्रो शहरांमध्ये दरमहा ५९ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
देशातील तिजोरीत मोठी भर, महिनाभरात जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर!
याप्रमाणे अर्ज करा:
karnatakabank.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर Apply Online लिंक वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://karnatakabankcsa.azurewebsites.net/
वाचा अधिकृत सूचना लिंक – https://images.bhaskarassets.com/web2images/521/2024/11/karnataka_1732521972.pdf
कर्नाटक बँकेबद्दल थोडक्यात माहिती
कर्नाटक बँक लिमिटेड ही मंगळूर येथे स्थित एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे. 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 915 शाखा, 1188 एटीएम आणि कॅश रिसायकलर आणि 588 ई-लॉबी/मिनी ई-लॉबीचे नेटवर्क असलेली ही ‘अ’ वर्ग अनुसूचित व्यावसायिक बँक आहे. त्याचे देशभरात 8,652 कर्मचारी आणि 11 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.