सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या आयपीओच्या शेअर्सचे आज वाटप होणार, वाचा... सविस्तर माहिती!
संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनी सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडचा 99.07 कोटी रुपयांचा आयपीओ (सी2सी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आयपीओ) 26 नोव्हेंबर रोजी बंद झाला आहे. आता शेअर्सचे वाटप आज 2 डिसेंबरला वाटप हाेईल. यापूर्वी शेअर्सचे वाटप 29 नोव्हेंबरला होणार होते. परंतु बाजार नियामक सेबीने शेअर वाटप निश्चित होण्यापूर्वीच अर्ज मागे घेण्यासाठी विंडो उघडण्यास सांगितले आहे.
2 डिसेंबरला शेअर्सचे वाटप अंतिम
अँकर गुंतवणूकदारांसह सर्व गुंतवणूकदारांना आयपीओमधून पैसे काढायचे असतील. तर त्यांना तसे करता यावे यासाठी सेबीने हे सांगितले होते. सेबीने कंपनीला स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करण्यास आणि स्वतंत्र आर्थिक लेखा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
अर्ज मागे घेण्याची खिडकी 29 नोव्हेंबरपर्यंत खुली होती. यामध्ये अनेकांनी आपले अर्जही मागे घेतले आहे. आता गुंतवणूकदारांसाठी शेअर्सचे वाटप 2 डिसेंबरला वाटप अंतिम केले जाईल. तर शेअर्सचे लिस्टिंग राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) एसएमईवर 3 डिसेंबर रोजी होईल. रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संकेतस्थळावरून शेअर्स वाटपाची स्थिती तपासली जाऊ शकते. याची प्रक्रिया जाणून घेऊया.
दोन बँकांमध्ये खाते असल्यास दंड ठोठावला जाणार? वाचा… आरबीआयचा नियम काय?
लिंक इनटाइमद्वारे वाटपाची स्थिती अशी तपासा
– https://linkintime.co.in/initial_offer/ ला भेट द्या.
– ड्रॉप डाउन मेनूमधून आयपीओ सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे नाव निवडा.
– आता ‘सिलेक्शन टाइप’ ड्रॉप डाउनमध्ये, अर्ज क्रमांक, डीपी क्लायंट आयडी, पॅन, खाते क्रमांक/आयएफएससी पैकी कोणताही एक निवडा आणि तपशील भरा.
– ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
– यानंतर आयपीओच्या वाटप स्थितीचे तपशील स्क्रीनवर दिसेल.
‘या’ आठवड्यात 6 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार; बक्कळ नफा मिळवण्यासाठी पैसे तयार ठेवा!
नवीन शेअर्स जारी
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आयपीओमध्ये 43.84 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. किंमत बँड 214-226 रुपये प्रति शेअर आणि लॉट आकार 600 शेअर्स होता. सीटूसी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पीव्हीआर मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी चंद्रा, माया चंद्रा, सुब्रमण्य श्रीनिवास नरेंद्र लंका, कुरियादथ रमेश आणि मुर्तझा अली सूराम हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)