फोटो सौजन्य - Social Media
रामा मूर्थी त्यागराजन भारतातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. तसेच हे नाव भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले नाव आहे. रामा त्यागराजन त्यांच्या साधेपणामुळे जाणले जातात. ते श्रीराम ग्रुप्सचे संस्थपाक आहेत. लक्षाधीषांच्या यादीमध्ये असलेले हे नाव अगदी सामान्यांसारखे आयुष्य जगतं, हे खरंच नवल वाटण्यासारखे आहे. १.१० लाख रुपये कोटी रुपयांचे आर्थिक सामर्ज्याचे सम्राट असणारे रामा त्यागराजन अगदी साधेपणाचे आयुष्य जगण्यास पसंती देतात. प्रत्येकाचे अनेक स्वप्न असतात.
हे देखील वाचा : शेअर बाजारात नेमकं चाललंय काय? सेन्सेक्स 460 अंकांनी आपटला, तर बजाज ऑटोचे शेअर 8% घसरले
बहुतेक जण तर त्यांच्या स्वप्नांची तसेच इच्छा आकांशांची यादी तयार करून ठेवतात. जवळजवळ सगळेच श्रीमंत व्यक्तींना महागड्या गाड्यांचा शौक असतो. महागडे मोबाईल, आलिशान घर असणे तर प्रत्येकाची इच्छा असते.बहुतेक लक्ष्यधीशांकडे तर एकाहून अधिक आलिशान गाड्या असतात, मोठमोठी बंगले असतात. परंतु, रामा त्यागराजन असे लक्षाधीश आहेत, ज्यांना या गोष्टींची काहीच आवड नाही आहे. अगदी साधे आयुष्य राहणे त्यांना पसंत आहे. ते अगदी सध्या घरात राहतात. त्यांच्या गाडीची किंमतही फक्त ६ लाख आहे.
१९६० च्या दशकामध्ये त्यांनी श्रीराम ग्रुपची स्थापना केली होती. एखादि लहान चिटफंड म्हणून सुरु केलेली कंपनी आता देशातील मोठ्या वित्तसेवा ब्रँड पैकी एक आहे.लहानापासून मोठे ध्येय गाठणे काय असते? याचे उत्तम उदाहरण रामा त्यागराजन यांची श्रीराम ग्रुप कंपनी आहे. आता या कंपनीचे बाजारमूल्य १.१० लाख रुपये कोटीचे आहे. अनुभव आपल्याला शिकवते. या अनुभवापासूनच रामा मूर्थी यांनी या कंपनीला सुरुवातॆली आहे. त्या काळात पारंपारिक बँका ट्रकचालक, कमी उत्पन्न मिळवणाऱ्यांसारख्या विशिष्ट गटांना सेवा देण्यास नाकारत असतं. या गोष्टीचा फायदा रामा मूर्थी यांनी घेतला. समाजातील आर्थिक दुर्बल घटकाला वित्त सेवा देणे तसेच ट्रकचालकांनाही सेवा पुरवल्याने, या कंपनीने कमी वेळात मोठे मार्केट काबीज केले.
हे देखील वाचा : इंडियन बॅंक आणि टाटा मोटर्समध्ये महत्वाचा करार ! व्यावसायिक वाहन खरेदीदारांना होणार लाभ
रामा मूर्थी त्यागराजन त्यांच्या दानधर्मासाठी ओळखले जातात. एकदा त्यांनी ७५० दशलक्ष डॉलर्सच्या कंपनीतले आपले भांडवल विकले आणि ते सर्व पैसे एका ट्रस्टला दान केले. समाजासाठी असलेला त्यांची परोपकारी वृत्ती आणि स्नेहभाव त्य्नाचे उत्तम वैशिष्ट्य आहे. याच कामामुळे त्यांना समाजात फार मान आहे. तसेच रामा मूर्थी त्यागराजन जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थळ आहेत.