LIC पहिल्यांदाच बोनस शेअर्सचे वितरण करण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्सची चर्चा सध्या सुरु आहे. LIC कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार आहे. 7 एप्रिल रोजी शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीनुसार, एलआयसीने जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर यावर निर्णय घेतला गेला आहे.
संचालक मंडळाच्या या बैठकीत भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर विचार केला गेला. याचा बोनस शेअर्सचे प्रमाण आणि ते कोणाला वितरित केले जातील हे निश्चित केले आहे. संचालक मंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता विद्यमान भागधारकांना त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या प्रत्येक शेअरमागे एक मोफत शेअर मिळणार आहे. यामुळे त्यांच्याकडील शेअर्सची संख्या वाढेल, परंतु किंमत प्रमाणात कमी होईल. केवळ त्या भागधारकांनाच बोनस शेअर्सचा फायदा होईल, ज्यांच्याकडे रेकॉर्ड डेटपूर्वी एलआयसीचे शेअर्स होते.
दरम्यान, यापूर्वी रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नव्हती. मात्र, बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट बैठकीनंतरच निश्चित केली आहे. संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर, हा प्रस्ताव लागू करण्यासाठी भागधारकांची मंजुरी देखील आवश्यक असेल. एलआयसीसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे, कारण कंपनी २०२२ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून प्रथमच बोनस शेअर्स जारी करणार आहे.
ट्रेडिंग विंडो बंद
इक्विटी शेअर्सच्या व्यापारासाठीची ट्रेडिंग विंडो सध्या बंद केली होती आणि ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षाच्या निकालांच्या घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत ती बंद राहील. अंतर्गत माहितीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून, कंपनीने बोनस इश्यूवर निर्णय होईपर्यंत आपले कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सदस्यांसाठी ट्रेडिंग विंडो बंद केली आहे.
बोनस शेअर्सची घोषणा
कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 बोनस शेअर्स जारी करायची घोषणा केली. म्हणजेच LIC गुंतवणूकदारांना आता त्यांच्याकडील प्रत्येक एका शेअरमागे एक अतिरिक्त शेअर मोफत मिळणार आहे.






