एलपीजीच्या किंमती, क्रेडिट कार्डचे नियम...; 1 नोव्हेंबरपासून 'हे' 6 मोठे बदल होणार?
ऑक्टोबर महिना संपत आला असून, नोव्हेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघा तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे चालू नोव्हेंबर महिन्यात देखील काही गोष्टींच्या नियमात बदल होणार आहे. या बदलाचा परिणाम सामान्य व्यक्तीच्या आर्थिक बजेटवर पडणार आहे. त्यामुळे नव्याने बदलणारे हे नियम सामान्यांसाठी खुप महत्त्वाचे असणार आहे.
एलपीजीच्या किमतीत बदल
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत असतात. कधी त्यांच्या किमती वाढतात तर कधी कमी केल्या जातात. यावेळी घरगुती वापरला जाणारा १४ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत थोडी कमी होण्याची शक्यता आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची जुलै महिन्यात 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली होती. मात्र तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत आहे.
सीएनजी-पीएनजीच्या किंमती
ज्याप्रमाणे दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. त्याच क्रमाने तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सीएनजी-पीएनजी तसेच एअर टर्बाइन इंधनाच्या किमती बदलत करतात. गेल्या काही महिन्यांपासून हवाई इंधनाच्या दरात कपात होतेय. त्यामुळे यंदाही सणासुदीच्या काळात अशीच अपेक्षा व्यक्त केली जातेय. सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड एक्सचेंजचे नियम
पहिल्या नोव्हेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डमध्येही मोठा बदल पाहायला मिळेल. 1 नोव्हेंबरपासून अनसिक्योर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दरमहा 3.75 रुपये फायनान्स चार्ज आकारला जाईल. जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे वीज, पाणी, एलपीजी गॅस आणि इतर बिले भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर तुमचं पेमेंट 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावर एक टक्के अतिरिक्त शुल्क लागेल.
हे देखील वाचा – “…अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल,” वाचा… महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?
म्युच्यूअल फंडच्या नियमात बदल
1 नोव्हेंबरपासून म्युच्युअल फंडांमध्येही मोठा बदल पाहायला मिळणार आहे. म्युच्युअल फंडांची सर्व युनिट्स आतापासून इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशनच्या प्रतिबंधाच्या कक्षेत येतील. सेबीने काही दिवसांपूर्वीच हा नियम जाहीर केला होता. सर्व नॉमिनी व्यक्ती किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केले असतील तर त्यांची संपूर्ण माहिती कंप्लान्यसन अधिकाऱ्याला 2 दिवसांच्या आत द्यावी लागेल.
टेलिकॉम इंड्रस्टीत बदल
टेलिकॉम इंडस्ट्रीत काही नियम बदल करण्यात आलेत. सरकारने जिओ, एअरटेल आणि इतर कंपन्यांना स्पॅम कॉल संदर्भात सक्त ताकीद दिलीय. कंपन्यांनी स्पॅम कॉल करणाऱ्या नंबरला ब्लॉक करण्याच्या सुचना दिल्यात.
बँकिंग क्षेत्रात बदल
नोव्हेंबर महिन्यात 13 दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. अनेक सण येत असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. या सुट्टीच्या दिवसांची संख्या १३ होत आहे.