मार्क झुकेरबर्ग यांनी उभारला पत्नीचा भव्य पुतळा, ...म्हणतायेत प्राचीन इतिहासाशी आहे संबंध!
सोशल मीडीया प्लटफॉर्म फेंसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीया प्लटफॉर्मचे मालक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या घराच्या मागच्या बाजुला अंगणात एक खास पुतळा उभारला आहे. त्यांनी आपली पत्नी प्रिसिला चॅन हिचा भव्य पुतळा अंगणात उभारला आहे. याबाबत मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे काही लोक झुकेरबर्ग यांच्या या पोस्टवर ‘Husband of the Year’ अशी प्रतिक्रिया देत आहेत.
का उभारलाय झुकेरबर्ग यांनी पत्नीचा पुतळा
विशेष म्हणजे समाजमाध्यावर हा पुतळा पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पत्नीचा पुतळा का बसवला? माञ, खुद्द मार्क झुकेरबर्ग यांनीच याचे उत्तर दिले आहे. फोटो शेअर करण्यासोबतच मार्क यांनी म्हटले आहे की, आपण जुन्या रोमन परंपरेचे पालन करत आहे. रोमन लोक आपल्या पत्नीचा पुतळा उभारतात. प्रिसिला चॅन यांचा हा पुतळा अमेरिकेतील प्रसिद्ध शिल्पकार डॅनियल आर्शम यांनी तयार केला आहे. प्रिसिला चॅनचा यांचा हा पुतळा तब्बल 7 फूट इतका उंच आहे.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
हेही वाचा – … वर्षभरात किती कमाई होते अंबानी कुटूंबाची, …आकडा ऐकून चक्रावून जाल
समाजमाध्यमांवर लोकांच्या प्रतिक्रिया
मार्क झुकरबर्ग यांनी समाजमाध्यावर शेअर केलेल्या पोस्टवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मार्क यांच्या या निर्णयाचे कौतुक करत म्हटले आहे की, मार्क यांनी आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी उचलले एक चांगले पाऊल आहे. तर अन्य एका यूजरने गंमतीशीर शैलीत म्हटले आहे की, आज जगातील प्रत्येक पती पत्नीला घाबरत आहे. तर पुतळ्याचे कौतुक करताना अन्य एका यूजरने म्हटले आहे की, तुमची पत्नी हुबेहूब देवीसारखी दिसत आहे.
पोस्टवर उपरोधिक टीका देखील
याउलट काही लोकांनी मार्क यांच्या या पोस्टवर उपरोधिक टीका देखील केली आहे. एका यूजरने याबाबत लिहिताना म्हटले आहे की, हा पुतळा बनवण्यासाठी खर्च झालेल्या पैशातून किती बेघर लोकांना मदत करता आली असती. त्यामुळे या मार्क झुकेरबर्ग यांच्या पत्नी प्रिसिला चॅन यांच्या पुतळ्यावरून समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; …तुमचे तर खाते नाही ना!
दोघांच्या लग्नाला झालेत १२ वर्ष
दरम्यान, मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांच्या लग्नाला एकूण १२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. दोघांना एकूण तीन मुली आहेत. दोघेही 2003 मध्ये कॉलेजमध्ये भेटले. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला मार्क झुकेरबर्ग-प्रिसिला चॅन हे बिझनेस वर्ल्डमधील एक पॉवर कपल्सपैकी एक आहेत.