भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मॅरियट इंटरनॅशनलचे पुरस्कार-प्राप्त पर्यटन व्यासपीठ मॅरियट बोनव्हॉय आणि देशातील सर्वात फायदेशीर व सर्वसमावेशक लॉयल्टी प्रोग्राम फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स यांनी भारतातील उद्योगामधील पहिल्या दुहेरी लॉयल्टी सहयोगाची घोषणा केलीी आहे. या सहयोगामध्ये मॅरियटल बोनव्हॉयची जागतिक रिवॉर्ड्स परिसंस्था आणि फ्लिपकार्टचे सुपरकॉइन्स एकत्र आले आहेत.
फ्लिपकार्टचा सुपरकॉइन्स मल्टी-ब्रँड रिवॉर्ड्स प्रोग्राम आहे, जी मुलभूत फ्लिपकार्ट प्लस लॉयल्टी योजना आहे. या सहयोगासह सदस्यांना अधिक कमावण्याचा, स्मार्टपणे रिडिम करण्याचा आणि जलदपणे रिवॉर्ड्स मिळवण्याचा सोपा मार्ग मिळाला आहे.
विक्रान इंजिनिअरिंगचा ७७२ कोटी रुपयांचा IPO २६ ऑगस्ट रोजी होणार लाँच, GMP १२ टक्क्यांपेक्षा जास्त
‘युअर कार्ट टेक यु प्लेसेस’वर आधारित भारतातील या अद्वितीय सहयोगामुळे लाखो सदस्यांना फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स व मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स विनासायासपणे मिळवता येतात आणि त्यांची देवाणघेवाण करता येते. तसेच दररोजच्या शॉपिंग कार्टपासून ते मोफत मुक्काम, सूट अपग्रेड आणि जगभरातील अविस्मरणीय गेटवे असे रिवॉर्ड्स मिळवता येतात.
मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्ट यांच्यातील धोरणात्मक सहयोगामुळे भारतातील ग्राहकांना दोन्ही कंपन्यांच्या सर्वोत्तम सुविधा मिळाल्या आहेत, ज्यामुळे खरेदी करणे, पैसे कमवणे आणि प्रवास करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे, यामुळे दैनंदिन व्यवहारामधून संस्मरणीय अनुभव मिळतो. दोन्ही ब्रँडचे अकाऊंट्स लिंक केल्यास सदस्य विशेष मॅरियट बोनव्हॉय सदस्यत्व फायदे मिळवू शकतात, फ्लिपकार्टवर खरेदी करताना मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स मिळवू शकतात आणि क्लिअरट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्हलवर उत्तम डीलचा आनंद घेऊ शकतात.
“हा धोरणात्मक सहयोग भारतातील आमच्या मॅरियट बोनव्हॉय सदस्यांना अधिक मूल्य देण्याच्या दिशेने उत्साहवर्धक पाऊल आहे. फ्लिपकार्ट सारख्या स्थानिक प्रमुख कंपनीसोबत सहयोग करत आम्ही लाखो ग्राहकांना सहजपणे पर्यटनाचे फायदे आणि दैनंदिन रिवॉर्ड्सचा आनंद देत आहोत. भारतातील ४० हून अधिक शहरांमध्ये १५९ हॉटेल्ससह आम्हाला फ्लिपकार्टच्या वापरकर्त्यांना आमचे जागतिक पर्यटन व्यासपीठ देण्याचा आनंद होत आहे, तसेच आम्ही त्यांना आमचे उच्चस्तरीय फायदे आणि विशेष मॅरियट बोनव्हॉय मोमेण्ट अनुभव देत आहोत. आगामी महिन्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय गंतव्य आणि जगभरातील आमच्या हॉटेल्सच्या व्यापक पोर्टफोलिओला समाविष्ट करत हा सहयोग अधिक विस्तारित करण्यास उत्सुक आहोत, ज्यामुळे आमच्या सदस्यांचा पर्यटन अनुभव अधिक उत्साहपूर्ण होईल,” असे मॅरियट इंटरनॅशनलचे चीन वगळता आशिया पॅसिफिकमधील मुख्य व्यावसायिक अधिकारी जॉन टूमी म्हणाले.
“हा सहयोग आमच्या विद्यमान ग्राहकांसाठी मूल्यामध्ये वाढ करतो, तसेच दोन्ही ब्रँड्सना भारतातील अद्भुत पर्यटन वाढीचा फायदा घेण्यास उत्तमरित्या सुसज्ज देखील करतो. हॉलिडे गेटवेपासून दैनंदिन खरेदीपर्यंत सदस्य आता क्रॉस-प्लॅटफॉर्म रिवॉर्ड्स मिळवू शकतात, जे त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून आहेत. हा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आहे, जेथे पॉइंट्स कमावण्यासोबत प्रत्येक क्षण, खरेदी व अनुभवाला महत्त्व दिले जाते,” असे मॅरियट इंटरनॅशनलच्या दक्षिण आशियामधील प्रादेशिक उपाध्यक्षा रंजू अॅलेक्स म्हणाल्या.
या धोरणात्मक सहयोगाबाबत मत व्यक्त करत फ्लिपकार्ट ट्रॅव्हलच्या प्रमुख मंजरी सिंघाल म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने मूल्याची भर करणारे अनुभव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि आम्हाला सुपरकॉइन्सला भारतातील सर्वात फायदेशीर व सर्वसमावेशक लॉयल्टी प्रोग्राम बनवण्याचा अभिमान आहे. या सहयोगासह फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स आणि मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स एकत्र आले आहेत.
याचा अर्थ असा की आम्ही केल्या जाणाऱ्या व्यवहारांना रिवॉर्ड्स देण्यासोबत खरेदी, पर्यटन व मुक्कामच्या माध्यमातून जीवनशैली उत्साहवर्धक करत आहोत. हा सहयोग एकीकृत, क्रॉस-कॅटेगरी रिवॉर्ड्स परिसंस्था तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करतो. फ्लिपकार्टवर खरेदी करणे असो, मॅरियटमध्ये राहण्याची बुकिंग करणे असो किंवा फ्लिपकार्ट ट्रॅव्हल किंवा क्लिअरट्रिपवर ट्रिपचे नियोजन करणे असो ग्राहक आता अधिक अर्थपूर्ण मार्गांनी रिवॉर्ड्स मिळवू आणि रिडीम करू शकतात.”
मॅरियट बोनव्हाय सदस्य फ्लिपकार्टच्या विशेष मार्केटप्लेसवर मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स मिळवू शकतात.
ग्राहकांनी दोन्ही प्लॅटफॉर्मचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे आणि फायदे मिळवण्यासाठी त्यांचे अकाऊंट्स लिंक करणे आवश्यक आहे.
अकाऊंट्स लिंक केलेले संयुक्त ग्राहक फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्समध्ये हस्तांतरित करू शकतात आणि Marriott.com वर हॉटेल बुक करण्यासाठी पॉइंट्स रिडीम करू शकतात.
सदस्य २ मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स १ सुपरकॉइनवर आणि २ सुपरकॉइन्स १ मॅरियट बोनव्हॉय पॉइंटवर एक्सचेंज रेटने मॅरियट बोनव्हॉय पॉइंट्स फ्लिपकार्ट सुपरकॉइन्समध्ये एक्सचेंज करू शकतात आणि फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी रिडीम करू शकतात.
फ्लिपकार्ट सदस्यांना प्रत्यक्ष प्लॅटफॉर्म (एफके ट्रॅव्हल), कॅटेगरीज पेज, सुपरकॉइन झोन आणि अकाउंट सेक्शनद्वारे मॅरियट बोनव्हॉय सदस्यत्व फायदे सहज उपलब्ध आहेत.
या सहयोगामुळे मॅरियट बोनव्हॉयचे मूल्य हॉटेल मुक्कामांच्या पलीकडे देखील मिळते, ते दैनंदिन जीवनात अधिक विनासायासपणे एकत्रित होते.