'हा' शेअर सलग पाचव्या दिवशी अप्पर सर्किटवर; 5 वर्षात दिला 38 हजार टक्के परतावा!
पेनी स्टॉक मर्क्युरी ईव्ही टेकमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.१) कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 132.60 रुपयांवर पोहोचले. कंपनीचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी अप्पर सर्किटवर आहेत. मर्क्युरी ईव्ही टेकचे शेअर्स 5 दिवसात 26 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने हायटेक ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 70 टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
हे देखील वाचा – महिनाभरात पैसे झाले दुप्पट; 6 रुपयांच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल!
5 वर्षात 38900 टक्के वाढ
मर्क्युरी ईव्ही टेकचे शेअर्स गेल्या 5 वर्षात 38900 टक्के वाढले आहेत. 30 सप्टेंबर 2019 रोजी कंपनीचे शेअर्स 34 पैशांवर होते. हा पेनी स्टॉक 1 ऑक्टोबर 2024 रोजी 132.60 रुपयांवर गेला आहे. गेल्या 3 वर्षांत मर्क्युरी ईव्ही टेकच्या शेअर्समध्ये 19400 टक्के वाढ झाली आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 68 पैशांवर होते, जे 1 ऑक्टोबर 2024 रोजी 132 रुपयांच्या पुढे गेले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 143.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 44.02 रुपये आहे.
(फोटो सौजन्य – istock)
एका महिन्यात 83 टक्के परतावा
मर्क्युरी इव्ह टेकने गेल्या एका महिन्यात 83 टक्के उसळी घेतली आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 72.32 रुपयांवर होते. 1 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 132.60 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 दिवसात मर्क्युरी ईव्ही टेकचे शेअर्स 26.35 टक्के वाढले आहेत. मर्क्युरी ईव्ही टेक 35 लाख रुपयांना हायटेक ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मधील 70 टक्के हिस्सा स्टेक खरेदी करेल. हायटेक ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिक वाहने बनवते आणि इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विकते.
काय करते ही कंपनी?
मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी आहे. कंपनी हॉस्पिटॅलिटी, उद्योग, गोल्फ कोर्स, क्लब आणि रिसॉर्ट्ससह विविध अनुप्रयोगांसाठी सानुकूल इलेक्ट्रिक वाहने तयार करते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)