मोतीलाल ओसवालच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी, मजबूत AUM वाढीमुळे स्टॉक्स 7 टक्क्याने वाढले (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Motilal Oswal Share Marathi News: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर गुरुवारी दलाल स्ट्रीटवर वर्चस्व गाजवत आहे. बाजार उघडल्यापासून शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी १:०० वाजता शेअर ७ टक्के वाढीसह ९१६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या बुधवारी शेअर ८५५ रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांपासून गुंतवणूकदार या शेअरमध्ये उत्सुकता दाखवत आहेत.
त्यामुळे या काळात शेअरच्या किमतीत ४६ टक्क्या पर्यंत वाढ झाली आहे. सर्वात महत्वाच म्हणजे आजच्या वाढीचे मुख्य कारण कंपनीच्या घोषणेनंतर दिसून येते ज्यामध्ये मोतीलाल ओसवाल यांनी म्हटले होते की त्यांची मालमत्ता व्यवस्थापनाखालील किंवा AUM १.५ लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. या सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.
मोतीलाल ओसवाल कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनी मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा एयूएम १.५ लाख कोटींवर पोहोचला आहे. यावरून असे दिसून येते की मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा आणि इतर पर्यायी गुंतवणूक निधीच्या व्यवसायात चांगली कामगिरी करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने चढ उतार होत आहे. काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, तर आज सकाळी शेअर बाजार सपाट उघडला आणि त्या नंतर घसरणीकडे वाटचाल करू लागला. आज ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी ऑटो इंडेक्स १.०५ टक्क्यांनी वाढला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ करणारा आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स देखील हिरव्या रंगात आहेत.
जून २०२० मध्ये मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची अॅसेट अंडर मॅनेजमेंट ३५१८० कोटी रुपये होती, जी पुढील ५ वर्षांत ३४ पटीने वाढून जून २०२५ मध्ये १.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (MOAMC) सध्या ८४ हजार कोटी रुपयांच्या सक्रिय म्युच्युअल फंड योजना हाताळत आहे, याशिवाय कंपनीने ३५६०० कोटी रुपयांच्या निष्क्रिय फंड योजना सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, कंपनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांद्वारे सुमारे १५००० कोटी रुपयांची गुंतवणूक हाताळत आहे. याशिवाय, कंपनी पर्यायी गुंतवणूक निधीद्वारे १७१०० कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत आहे.
मोतीलाल ओसवाल कंपनीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी देशभरात सुमारे २०० ठिकाणी मालमत्ता व्यवस्थापन सेवा प्रदान करत आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७९ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. लक्षात ठेवा की मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी अद्याप भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध नाही.