मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातर्फे (CSMIA), महाराष्ट्रातील (Maharashtra) अस्सल अनन्यसाधारण स्वाद साजरे करण्यासाठी ‘इकाई महाराष्ट्र’ या अव्वल दर्जाच्या लग्झरी मिठाई व नमकीन ब्रॅण्डची (Mithai And Namkeen Brand) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम खाद्यपदार्थांची ओळख सर्वांना करून देणाऱ्या अस्सल, नवोन्मेषकारी गोड व खाऱ्या (नमकीन) पदार्थांप्रती बांधिलकी हा इकाई महाराष्ट्र या ब्रॅण्डचा गाभा आहे.
मुंबईतून अन्यत्र प्रवासासाठी निघणाऱ्या प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इकाई महाराष्ट्र स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील चविष्ट खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी उत्सुक प्रवाशांसाठी हे दुकान आहे. राज्याचे वैशिष्ट्य असलेल्या स्वादांचे व पदार्थांचे न संपणारे वैविध्य महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीत आहे. इकाई महाराष्ट्रच्या माध्यमातून सीएसएमआयएने मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना केवळ या पदार्थांची चव घेण्याचीच नव्हे, ते सर्वत्र घेऊन जाण्याची सोय केली आहे. महाराष्ट्रातील चविष्ट खाद्यपदार्थ विमानतळावर एका छताखाली उपलब्ध होणार आहेत.
[read_also content=”मॅच सुरू असतानाच आलं चक्रीवादळ, अंपायरने केली चपळाई आणि असा वाचवला खेळाडूचा जीव; पाहा VIDEO https://www.navarashtra.com/viral/shocking-viral-video-baseball-player-trapped-in-tornado-on-playground-umpire-saved-life-nrvb-401185/”]
प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी तसेच प्रवाशांना महाराष्ट्रातील स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव देण्यासाठी सीएसएमआयए बांधील आहे. इकाई महाराष्ट्र स्टोअर हे टर्मिनल टू वर आहे. या स्टोअरमध्ये स्नॅक्स, गोड पदार्थ आणि महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेल्या पाककृती उपलब्ध आहेत. स्थानिक स्तरावरून प्राप्त केलेले, प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर नसलेले, अस्सल घटकांपासून तयार केलेले महाराष्ट्राच्या विविध भागांमधील पदार्थ उपलब्ध करून देत राज्याचा समृद्ध खाद्यवारसा साजरा करण्याचा इकाई महाराष्ट्रला अभिमान आहे. दर्जा व नवोन्मेषाशी ठाम बांधिलकी असलेला इकाई महाराष्ट्र अल्पावधीतच गोड व नमकीन पदार्थांच्या अव्वल प्रवर्गातील आघाडीचा ब्रॅण्ड म्हणून उदयाला आला आहे. केवळ सीएसएमआयएवरच उपलब्ध असलेल्या या ब्रॅण्डचे उद्दिष्ट, महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा अर्क टिपत प्रवाशांना अद्वितीय खाद्यानुभव देऊ करणे, हे आहे.
एक अव्वल दर्जाचा, लग्झरी मिठाई व नमकीन ब्रॅण्ड म्हणून इकाई महाराष्ट्रचा प्रवास २०२२च्या सुरुवातीला सुरू झाला. टीमने विस्तृत संशोधन केले, सहा महिने महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रवास केला, अनेक शहरे व जिल्ह्यांतील खास खाद्यपदार्थ शोधले, नवोन्मेषकारी पाककृती तयार केल्या आणि सध्याच्या उत्पादनांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी विस्तृत उत्पादन चाचण्या घेतल्या.
‘इकाई महाराष्ट्र’च्या माध्यमातून, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची खरेदी अखेरच्या क्षणाला करण्याची सोय सीएसएमआयएने प्रवाशांना करून दिली आहे. अनेक प्रवाशांची ही मागणी होती. त्यामुळे प्रवाशांना उच्च दर्जाचा प्रवास अनुभव पुरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सीएसएमआयएच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा, नागपूरची संत्री, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, कोकण किनारपट्टीतील नारळ, अमरावतीतील आवळा आणि मुंबईतील आइस हलवा ह्यांसारखे राज्याचे वैशिष्ट्य असलेले घटक मिठायांमध्ये वापरले गेले आहेत. खाऱ्या पदार्थांमध्ये रायगड जिल्ह्यातील नागली, कोल्हापूरमधील संकेश्वरी मिरची, महाबळेश्वरचे फुटाणे, मुंबईतील पावभाजीपासून प्रेरित खाद्यपदार्थ तसेच कोकणातील काजूंचा समावेश आहे.
‘इकाई महाराष्ट्र’च्या चव घेतलीच पाहिजे अशा आघाडीच्या ३ खाद्यपदार्थांमध्ये हापूस चॉकलेट कतली, नारळाची वडी आणि महाबळेश्वर स्ट्रॉबेरी पिस्ता बर्फी या गोड पदार्थांचा, तर कोकणी काजूची भाजी, रायगड रागीची पापडी आणि बटाटावडा गाठिया या तिखट (नमकीन) पदार्थांचा समावेश होतो. इकाई महाराष्ट्रची सर्व उत्पादने प्रिझर्वेटिव मुक्त आहेत आणि ती दीर्घकाळ टिकून राहावीत यासाठी त्यांचे पॅकेजिंग स्वतंत्ररित्या करण्यात आले आहे. त्यामुळे गोड पदार्थ ४५ दिवस, तर खारे पदार्थ ९० दिवस टिकणारे आहेत. तेव्हा, विमानतळावर प्रतिक्षा करताना स्नॅक्स खाण्याची इच्छा असलेले प्रवासी असोत किंवा खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाण्याची इच्छा असलेले पर्यटक असोत, इकाई महाराष्ट्रमध्ये विविध पॅकेट्समध्ये हे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
[read_also content=”रक्तरंजित घटना ऐकली होती पण ‘या ठिकाणी’ नळातून येतंय रक्ताळलेलं पाणी; वाचा महाराष्ट्रात कुठं घडलीये ही हृदयद्रावक घटना https://www.navarashtra.com/viral/shocking-horrible-news-heart-wrenching-incident-in-nagpur-blood-came-out-of-the-tap-water-of-the-house-nrvb-401165/”]
सीएसएमआयएचे प्रवक्ता या स्टोअरबद्दल म्हणाले, “सीएसएमआयएवर इकाई महाराष्ट्र स्टोअर सुरू करणे आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातून बाहेर पडण्यापूर्वी, महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या व अनन्यसाधारण चवींचा आस्वाद घेण्याची संधी, इकाई महाराष्ट्र, प्रवाशांना देत आहे. एक प्रवासीकेंद्री विमानतळ म्हणून प्रवाशांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि अखेरीस त्यांचा अनुभव स्मरणीय करण्यासाठी, सीएसएमआयए सातत्याने प्रयत्नशील असते. इकाई महाराष्ट्र हे स्टोअर सुरू झाल्यामुळे विमानतळावरील रिटेल उत्पादनांचे मूल्यवर्धन होईल व त्यात एक वैशिष्ट्य निर्माण होईल, असे आम्हाला वाटते.”
इकाई महाराष्ट्र या स्टोअरची मालकी असलेल्या वन क्लिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी यावेळी म्हणाले, “आजवर फारसे लक्ष न दिल्या गेलेल्या तसेच मोठी संभाव्यता असलेल्या प्रवर्गांमध्ये नवोन्मेष व वैविध्य आणणाऱ्या स्टार्टअप्सना शोधून काढणे, उत्तेजन देणे व त्यांच्याशी सहयोग करण्याचे काम मुंबई विमानतळ करते ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची व आनंदाची बाब आहे. इकाई महाराष्ट्र हा एक अनन्यसाधारण ब्रॅण्ड असून, तो राज्याच्या सांस्कृतिक वारशावर व एतद्देशीय घटकांवर लक्ष केंद्रित करतो. इकाई महाराष्ट्र अग्रभागी आणण्यासाठी आमच्या टीमने विस्तृत संशोधन केले आहे, जेणेकरून महाराष्ट्राची चव खऱ्या अर्थाने सांगणाऱ्या या उत्पादनांचा आस्वाद प्रवाशांना घेता यावा.”
जबाबदार खरेदी व स्वयंपाकाच्या पद्धतींवर ब्रॅण्डने निश्चलतेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे केवळ चविष्टच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनन्यसाधारण पाककला वारशाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या मिठाई व नमकीनची संपूर्ण श्रेणी तयार झाली आहे. बारीक तपशिलांकडेही लक्ष दिल्यामुळे प्रत्येक उत्पादन हे सर्वोच्च दर्जाचे व अस्सल झाले आहे. ग्राहकाच्या जिभेवर महाराष्ट्राचा खराखुरा अर्क आणण्याचे काम ही उत्पादने करत आहेत. ब्रॅण्डचे पॅकेजिंग व उत्पादने यांवरही राज्याचे व राज्यातील वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधित्व दिसून येते.
महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीचा ध्वजवाहक म्हणून मुंबईला स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक खोक्यावर महाराष्ट्राशी संबंधित घटकांबद्दल माहिती देणारे अनन्यसाधारण डिझाइन आहे. गणपती बाप्पा बॉक्स, बेस्ट बस प्रीमियम चखना बॉक्स, द टॉवर बॉक्स (डबेवाले) यांसारख्या अनेक डिझाइन्स खोक्यांवर आहेत. ही खोकी शाश्वत साहित्यापासून, प्लास्टिकचा वापर न करता, जैवविघटनशील पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करण्यात आली आहेत. पदार्थाची गळती होणार नाही व विमान प्रवासासाठी सुरक्षित अशा पद्धतीने पॅकेजिंग करण्यात आले आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
आशियातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर स्थापन झालेले इकाई महाराष्ट्रचे पहिले स्टोअर म्हणजे मोठे यश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारा अनोखा ब्रॅण्ड तयार झाला आहे आणि महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ स्मृतीच्या स्वरूपात सोबत घेऊन जाण्याची संधी तो प्रवाशांना देत आहे.
1. महाराष्ट्रातील समृद्ध अभिरूचीला उत्तेजन देण्यासाठी सीएसएमआयएने ‘इकाई महाराष्ट्र’ अशा प्रकारचे पहिलेच आउटलेट काढले आहे.
2. वन क्लिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देशभरातील मिठाई, नमकीन, स्नॅक्स व अनोख्या पाककृती एकत्र आणण्याच्या व्यवसायात आहे. या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन इकाई महाराष्ट्र ही अनन्य साधारण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
3. हे आउटलेट सुरू झाल्यामुळे मुंबईबाहेर जाणारे प्रवासी आता प्रिझर्वेटिव मुक्त महाराष्ट्रीय स्वाद सर्वत्र घेऊन जाऊ शकतील.