Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Income-Tax Bill: नवीन आयकर विधेयकातील व्हर्च्यूअल डिजिटल स्पेसमुळे वाढले टेन्शन, आयटी तपासणार सोशल अकाऊंट

New Income-Tax Bill: आयकर विधेयकात केलेली व्हर्च्युअल डिजिटल स्पेसची व्याख्या विस्तृत आहे आणि त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की एखाद्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स, ट्रेडिंग, गुंतवणूक अकाउंट्स आणि ईमेल

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 05, 2025 | 02:53 PM
New Income-Tax Bill: नवीन आयकर विधेयकातील व्हर्च्यूअल डिजिटल स्पेसमुळे वाढले टेन्शन, आयटी तपासणार सोशल अकाऊंट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

New Income-Tax Bill: नवीन आयकर विधेयकातील व्हर्च्यूअल डिजिटल स्पेसमुळे वाढले टेन्शन, आयटी तपासणार सोशल अकाऊंट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

New Income-Tax Bill Marathi News: १ एप्रिल २०२६ पासून आयकर विभागाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स, वैयक्तिक ई- मेल, बँक अकाउंट्स, ऑनलाइन गुंतवणूक अकाउंट्स, ट्रेडिंग अकाउंट्स इत्यादी तपासण्याचा आणि त्यांचे नियंत्रण घेण्याचा कायदेशीर अधिकार असेल. जर विभागाला असा संशय असेल की तुम्ही आयकर चुकवला आहे किंवा तुमच्याकडे कोणतेही अघोषित उत्पन्न, पैसे, सोने, दागिने किंवा मौल्यवान मालमत्ता आहे ज्यावर तुम्ही कर भरलेला नाही तर त्यांना संबंधित बाबींची तपासणी करण्याचा अधिकार असेल. आतापर्यंत आयकर विभागाला झडती घेण्याचा आणि जप्त करण्याचा अधिकार होता. आता नवीन आयकर विधेयकात, आयकर विभागाचे क्षेत्र तुमच्या संगणक प्रणाली आणि डिजिटल स्पेसपर्यंत वाढविण्यात आली आहे.

व्हर्च्यूअल डिजिटल स्पेस म्हणजे काय ?

नवीन आयकर विधेयकाच्या कलम २४७ नुसार, जर अधिकृत अधिकाऱ्याला सद्भावनेने असे वाटत असेल की एखाद्या व्यक्तीकडे अघोषित उत्पन्न किंवा मालमत्ता आहे, तर ते कोणत्याही संगणक प्रणाली, व्हर्चुअल डिजिटल स्पेस, ईमेल, सोशल मीडिया खाती, बँकिंग खाती, गुंतवणूक खाती इत्यादींमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश कोड ओव्हरराइड करू शकतात. याचा अर्थ असा की आता आयकर अधिकारी तुमचे ईमेल, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाइन गुंतवणूक, बँक अकाउंट्स इत्यादी कायदेशीररित्या अॅक्सेस करू शकतात.

Donald Trump Tariff War: चीन, कॅनडा नंतर आता मेक्सिकोनेही अमेरिकेला धक्का देत घेतला मोठा निर्णय!

हे गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे का?

कायदे तज्ज्ञांच्या मते, ही नवीन तरतूद गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करू शकते. प्राप्तिकर विधेयकातील व्हर्च्यूअल डिजिटल जागेचा विस्तार संवैधानिक वैधता, सरकारी अतिरेक आणि त्याच्या व्यावहारिक अंमलबजावणीबद्दल गंभीर चिंता निर्माण करतो. परंतु या विधेयकात दिलेल्या व्हर्चुअल डिजिटल स्पेसची व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक आणि वैयक्तिक डिजिटल उपस्थितीवर अमर्यादित देखरेख ठेवण्याची परवानगी देते. न्यायालयीन देखरेख किंवा योग्य प्रक्रियेशिवाय अशा अधिकारामुळे अयोग्य तपास आणि डेटा चोरी होऊ शकतो.

कंपनीचा डेटादेखील होऊ शकतो चेक

त्याचा परिणाम केवळ वैयक्तिक डेटापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यामध्ये संबंधित करदात्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या कंपन्यांचा डेटा देखील समाविष्ट असू शकतो. करचोरी आणि काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल माहितीची उपलब्धता आवश्यक असली तरी ती वैयक्तिक आणि कॉर्पोरेट डेटा संरक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करू शकते. या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळू शकते, असे संविधान तज्ञांचे मत आहे. हे व्यवसाय आणि व्यक्तींसाठी चिंतेचा विषय असू शकते, कारण कोणतेही स्पष्ट सुरक्षा उपाय प्रदान केलेले नाहीत. येत्या काळात हा कायदेशीर वादाचा एक मोठा मुद्दा बनू शकतो.

संविधानाची कलम २१

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की कलम २१ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा अधिकार आहे आणि कोणताही सरकारी हस्तक्षेप कायदेशीरता, आवश्यकता आणि प्रमाणिकतेच्या चाचण्या उत्तीर्ण झाला पाहिजे. नवीन आयकर विधेयकात शोध आणि जप्तीचे अधिकार मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत.

Shreenath Paper IPO:  लिस्टिंग होताच लोअर सर्किट, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Web Title: New income tax bill tensions have increased due to virtual digital space in the new income tax bill it will check social accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • income tax
  • New income tax bill

संबंधित बातम्या

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत
1

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत

New Income Tax Bill: सर्वसामान्य नागरिकांवर होणार परिणाम? नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर! नवीन कायद्यात काय? जाणून घ्या
2

New Income Tax Bill: सर्वसामान्य नागरिकांवर होणार परिणाम? नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर! नवीन कायद्यात काय? जाणून घ्या

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?
3

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?
4

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.