
New rule of Kotak Mahindra Bank
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांसाठी नवा नियम लागू केला आहे. 1 डिसेंबर 2025 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या लाखो ग्राहकांना SMS सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बँकेच्या ग्राहकांना SMS अलर्टसाठी 15 पैसे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याशिवाय, काही कार्डांवर नोव्हेंबरपासून डेबिट कार्ड शुल्क सुद्धा कमी केले आहे.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कोटक बँकेच्या ग्राहकांना 15 पैसे अतिरिक्त शुल्क लागू होतील. पण, जे खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची मर्यादा पाळणार नाही त्यांना नवीन शुल्क लागू होईल. ग्राहकांना वेळेवर व्यवहार अपडेट्स देण्यासाठी हे पाऊल उचल्याचे बँकेने म्हटले आहे.
हेही वाचा : LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
कोटक महिंद्रा बँकेने वाढवले SMS अलर्ट शुल्क
बँक तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे डेबिट किंवा क्रेडिट झाल्यावर SMS पाठवते ज्यामुळे तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळते. उदाहरणार्थ, एखादा ग्राहक UPI द्वारे पैसे पाठवत असेल तर, ते पैसे क्रेडिट झाले किंवा डेबिट झाले यांची माहिती त्या ग्राहकाला SMS द्वारे मिळते. तसेच, ATM मधून पैसे काढण्यासह चेक जमा करणे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता किंवा रोख व्यवहार करता तेव्हा ग्राहकाला अशा सर्व कृतींचा तपशील देण्यासाठी SMS अलर्ट पाठवण्यात येतो. यामुळे सगळे व्यवहार तुमच्या देखरेखीत होते. आता फक्त त्याला बँक ग्राहकांना त्या सेवेसाठी अतिरिक्त शुल्क लागू करणार आहे.
हेही वाचा : 15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम, ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ‘दुगना लगान’
डेबिट कार्ड फी कमी, पण SMS शुल्क वाढले
हा शुल्क प्रत्येक खातेदाराला लागू होणार नाही. बचत किंवा सॅलरी अकाउंटमध्ये तुम्ही एकूण 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम शिल्लक असेल तर खातेदाराला नवीन शुल्क अजिबात भरायची गरज नाही. त्यातही जर ग्राहकांचा पगार नियमित जमा होत असेल तर त्यांना सूट मिळेल. 5000 रुपयांची मर्यादा 811 अकाउंट होल्डर्ससाठी राखीव आहे. जर ही रक्कम खात्यात शिल्लक राहिली तर तुमचे एसएमएस शुल्क कापणार नाही.
दुसरीकडे, कोकट बँकेने काही विशेष बदलही केलेत. काही डेबिट कार्ड्सचे 1 नोव्हेंबर 2025 पासून शुल्क कमी केले असून प्रिव्ही लीग ब्लॅक मेटल या डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क 5 हजार रुपयांवरून 1,500 रुपयेपर्यंत घटवण्यात आले आहे. याशिवाय प्रिमियम कार्ड वापरणाऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. याचे शुल्क सुद्धा अडीच हजारवरून दीड हजारपर्यंत कमी करण्यात आले आहे.