Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार!

नवीन नियमांनुसार, येत्या 1 ऑगस्ट 2024 पासून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. या नवीन नियमांनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्डच्या शुल्कातही बदल पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ऑगस्ट महिन्यापासून होणाऱ्या नवीन बदलांबद्दल जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 27, 2024 | 06:24 PM
1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार!

1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारने नुकताच आर्थिक वर्ष २०२४-१५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अशातच आता जुलै महिना संपत आला असून, ऑगस्ट महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्यामुळे नेहमी प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या नियमांतील बदलानुसार काही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, 1 ऑगस्ट 2024 पासून नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ बदल

१. गॅस सिलिंडरचे दर : नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. गेल्या महिन्यात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानुसार आता पुन्हा 1 ऑगस्ट रोजी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातील. यावेळीही सरकार गॅस सिलिंडरचे दर कमी करते की त्यात वाढ होते? याकडे लक्ष लागून आहे.

२. गुगल मॅप नियम बदलणार : भारतात गुगल मॅपने देखील काही नियमात बदल केले असून, हे बदल 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. त्यानुसार, कंपनीने आपल्या सेवांचे शुल्क 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. याशिवाय Google Maps या सेवेसाठी डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारले जाणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)

३. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड : 1 ऑगस्ट 2024 पासून एचडीएफसी बँकेकडून टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्ड्समध्ये बदल होतील. या कार्डधारकांना टाटा न्यू यूपीआय आयडी वापरून व्यवहारांवर 1.5 टक्के न्यूकॉईन्स मिळतील.

४. ईएमआय प्रक्रिया शुल्क : नवीन नियमांनुसार, उशीरा पेमेंट टाळण्यासाठी सुलभ हप्त्यांची सुविधा देखील उपलब्ध होईल. मात्र, यासाठी ग्राहकांना 299 रुपयांपर्यंतचे ईएमआय प्रोसेसिंग चार्ज द्यावा लागेल. एचडीएफसी बँकेच्या मते, हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही या बँकेतूनही थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 1 टक्के शुल्क द्यावे लागेल.

५. यूटिलिटी व्यवहार : एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे वीज बिल, भाडे आणि इतर उपयुक्तता व्यवहारांशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. हे बदल भाडे, शिक्षण आणि युटिलिटी बिलांसाठी थर्ड पार्टी ॲप्सद्वारे केलेल्या व्यवहारांसह विविध व्यवहारांवर परिणाम करतील. 1 ऑगस्टपासून, CRED, PayTM, Cheq, MobiKwik आणि Freecharge सारख्या थर्ड पार्टी पेमेंट ॲप्सद्वारे HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या सर्व भाडे व्यवहारांवर व्यवहाराच्या रकमेवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल.

Web Title: New rules august 2024 rules will change from august 1 common people pockets strained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 06:23 PM

Topics:  

  • HDFC Bank

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.