...आता वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही; सुरु झालीये 'ही' भन्नाट सुविधा!
आपल्यापैकी अनेक जण दररोज मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. मात्र, प्रवास करताना वेळेत फास्ट टॅग रिचार्ज करणे आवश्यक असते. अनेकांना प्रवासाला निघण्यावेळी आपला फास्ट टॅग बॅलन्सकडे लक्ष द्यावे लागते. कारण टोल गेटवर पोहोचल्यानंतर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे नसतील तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागतो. टोल गेटवरून परत आल्यानंतर आणि रिचार्ज केल्यानंतर, फास्टॅग खात्यात पैसे अपडेट होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवासी वाहनधारकांचा हा सर्व त्रास आता थांबणार आहे.
बँक खात्यातून फास्ट टॅगवर पैसे ट्रान्सफर होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) थेट बँक खात्यातून फास्ट टॅगवर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू केली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) धारक देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. आरबीआयने फास्टॅग आणि एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मध्ये स्वयंचलित मनी ट्रान्सफरसाठी ई-आदेश फ्रेमवर्क मंजूर केले आहे. त्यामुळे आता देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हेही वाचा – ‘या’ विमान वाहतूक कंपनीवर डीजीसीएची मोठी कारवाई, ठोठावला इतका दंड! वाचा… नेमकं कारण
वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही
आरबीआयने ही सुविधा सुरु केल्याने, प्रवाशांना आता वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. फास्टॅग प्रणालीच्या माध्यमातून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी टोल संकलन केले जाते. जेणेकरून ग्राहकांना रोख रक्कम न भरता, फास्टॅगच्या माध्यमातून टोल प्लाझा जलदरित्या पार करता येतो. यासाठी प्रवाशांना आपला फास्टॅग रिचार्ज करणे आवश्यक असते. मात्र, हीच बाब लक्षात घेऊन आता फास्टॅग आणि एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मध्ये स्वयंचलितरिच्या पैसे ट्रान्सफर होणार आहे.
प्रवाशांची डोकेदुखी कमी होणार
यापुर्वी तुम्हाला तुमच्या फास्टॅग बॅलन्सची सतत काळजी करावी लागत होती. बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या ॲपद्वारे रिचार्ज करायला लागत होते. मात्र, आता तुमच्या फास्टॅगचा बॅलन्स विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाल्यास, तुमचा फास्टॅग बँक खात्यातून आपोआप रिचार्ज होणार आहे. यामुळे तुम्हाला कधीही टोल गेटवर अडकून पडावे लागणार नाही. आरबीआयच्या या नवीन सुविधेमुळे प्रवाशांची प्रवासादरम्यान होणारी डोकेदुखी कमी होणार आहे.