'या' कंपनीने ॲपलला टाकले मागे, भारतातही केलीये मोठी डील; बनलीये जगातील सर्वात मौल्यवान कंपनी?
दिग्गज चिप कंपनी एनव्हिडिया ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. यासह एनव्हिडियाने आयफोन उत्पादक कंपनी ॲपलला मागे टाकले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एनव्हिडियाचे शेअर बाजार मूल्य ३.५३ ट्रिलियन डॉलर, तर ॲपलचे बाजार मुल्य ३.५२ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. त्यामुळे आता एनव्हिडिया ही जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
एनव्हीडियाच्या शेअरमध्ये तेजी
दरम्यान, जून महिन्यात देखील एनव्हीडिया ही काही काळासाठी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती. कंपनीने मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला मागे टाकत ही जागा मिळवली होती. मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य ३.२० ट्रिलियन डॉलर होते. एनव्हिडियाचा शेअर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत जवळपास १८ टक्क्यांनी वधारला आहे. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय या कंपनीने ६.६ अब्ज डॉलर्सच्या फंडिंग राऊंडच्या घोषणेनंतर ही तेजी दिसून येत आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? आयटीआरचा आकडा 9 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता!
भारतातही केलीये मोठी डील
एनव्हिडियाला हे यश अशावेळी मिळाले जेव्हा कंपनीने भारतीय उद्योजकांसोबत अनेक धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही भागीदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा व्यवसायातील भारताच्या प्रचंड क्षमतेचा फायदा घेण्यासाठी करण्यात आली आहे. नुकतेच कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग मुंबईत झालेल्या ‘एनव्हीडिया एआय कॉन्फरन्स २०२४’ कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे देखील वाचा – विकिपीडियाला दान देणे बंद करा, एलॉन मस्क यांचे मोठे विधान; वाचा… सविस्तर
रिलायन्स आणि टाटांसोबत डील
एनविडिया रिलायन्सच्या डेटा सेंटर्ससाठी आपले ब्लॅकवेल एआय प्रोसेसर पुरवणार आहेत. याशिवाय कंपनी योट्टा डेटा सर्व्हिसेस आणि टाटा कम्युनिकेशनसारख्या कंपन्यांच्या डेटा सेंटर्ससाठी हॉपर एआय चिप्स देणार आहेत. याशिवाय त्यांनी टेक महिंद्रासोबतही करार केला असून, सीओआय सुरू करणार आहेत. हे केंद्र पुणे आणि औरंगाबादमध्ये महिंद्राच्या मेकर्स लॅबमध्ये असतील.
दरम्यान, सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेली कंपनी ॲपल आपल्या मोबाईलच्या मागणीत घट झाल्याचा सामना करत आहे. विशेषत: चीनमध्ये तिसऱ्या तिमाहीतील विक्रीत 0.3 टक्के घट झाली आहे. तर हुवेईच्या विक्रीत 42 टक्के घट झाली आहे. ऍपलच्या तिमाही कमाईचा अहवाल या गुरुवारी प्रसिद्ध होणार असल्याने, विश्लेषकांना 5.55 टक्के कमाई वाढून 94.5 अब्ज डॉलर इतका होण्याची अपेक्षा आहे. याउलट, एनविडियाने वर्षानुवर्षे सुमारे 82 टक्के कमाई वाढणे अपेक्षित आहे, जे 32.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल.