भारतीय कंपन्यांसाठी खुशखबर..! ऑफिस रेंट संदर्भात महत्वाची बातमी समोर, वाचा... सविस्तर!
कोरोना काळात सर्व कंपन्यांची कामे घरून होऊ लागली. ज्यामुळे दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या महत्वाच्या शहरांमध्ये ऑफिस ही ओस पडली होती. मात्र, 2023 नंतर यात बदल झाला असून, या तिन्ही शहरांमध्ये ऑफिसेसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परंतु आता खासगी कंपन्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील सहामाहीत दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमधील कार्यालयांचे भाडे स्थिर राहतील, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या भाड्यापासून कंपन्यांना दिलासा मिळणार आहे.
दिल्ली-एनसीआर, मुंबई सर्वात महागडा भाग
नाइट फ्रँक एपीएसी प्राइम ऑफिस रेंटल इंडेक्सनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई हे आशिया पॅसिफिकमधील टॉप 10 महागड्या मार्केटमध्ये समाविष्ट आहेत. तर दिल्ली-एनसीआर हा परिसर आशिया पॅसिफिक प्रदेशातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात महागडा ऑफिस स्पेस भाडे बाजार आहे. गेल्या तिमाहीत हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडे ऑफिस मार्केट राहिले आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील तीन मोठ्या बाजारपेठांमध्ये कार्यालयीन व्यवहारात सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या महत्वाच्या शहरांचा समावेश आहे.
हेही वाचा : थार, XUV 700, स्कॉर्पियोची डिझाईनर आहे ‘ही’ महिला; त्यांची संपत्ती ऐकून अवाक व्हाल!
लीजिंग मार्केटमध्ये बेंगळुरू टॉपवर
नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत बेंगळुरूमध्ये 49 लाख स्क्वेअर फूट ऑफिस स्पेस लीजवर घेण्यात आली आहे. यासह, बेंगळुरूने ऑफिस लीजिंग मार्केटमध्ये आपले मजबूत स्थान कायम ठेवले आहे. देशातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवत आहेत. त्यामुळे कार्यालयाच्या जागेची मागणी वाढली आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूच्या बाजारात स्थिरता आली आहे. येथील भाडेवाढ सध्या स्थिर आहे. अहवालात समाविष्ट 23 पैकी 15 शहरांमध्ये हीच परिस्थिती कायम आहे.
काय म्हटलंय नाइट फ्रँकच्या अध्यक्षांनी?
नाइट फ्रँकचे अध्यक्ष आणि एमडी शिशिर बैजल यांच्या मते, जागतिक कॉर्पोरेट्सच्या स्वारस्यामुळे भारतीय ऑफिस स्पेस मार्केटला गती मिळाली आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आली आहे. यामुळेच पहिल्या तिमाहीत ऑफिस स्पेस व्यवहारात सुमारे 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या तिमाहीत स्थिरता कायम राहील. असेही अहवालात सांगण्यात आले आहे.