थार, XUV 700, स्कॉर्पियोची डिझाईनर आहे 'ही' महिला; त्यांची संपत्ती ऐकून अवाक व्हाल!
महिंद्राच्या थार, XUV 700, स्कॉर्पियो या गाड्या सध्या भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहे. या तीनही गाड्या रस्त्याने कुठेही दिसल्या तरी अनेकांच्या नजरा तिकडे वळल्याशिवाय राहत नाही. मात्र, आता या तीनही गाड्या भारतीय पुरुषांना भुरळ घालत असल्या तरी त्यांची डिझाईन रामकृपा अनंतन या महिलेने केली आहे. ज्यामुळे या तीनही गाड्या विशेष ठरतात. मात्र, आता तुमच्या मनात रामकृपा अनंतन या कोण आहेत? त्यांची एकूण संपत्ती किती आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. विशेष म्हणजे रामकृपा अनंतन यांची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यांच्या तीनही गाड्या भारतीयांमध्ये लोकप्रिय
रामकृपा अनंतन यांनी महिंद्रा कंपनीच्या थार, XUV 700, स्कॉर्पियो या तीनही गाड्यांचे डिझाईन केले आहे. त्यामुळे आज ऑटो उद्योग क्षेत्रात रामकृपा अनंतन यांना ओळखत नाही. असा एकही व्यक्ती सापडणार नाही. त्यांना कृपा अनंतन या नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी डिझाईन केलेल्या या तीनही गाड्या भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्या लोकप्रिय होण्यात रामकृपा अनंतन या महिलेला मोठे श्रेय जाते. रामकृपा अनंतन यांनी आयआयटी मुंबई येथून मास्टर ऑफ डिजाइनमध्ये पदवी संपादन केली असून, त्या 1997 पासून महिंद्रा कंपनीमध्ये कार्यरत आहे.
हेही वाचा : राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर, अर्थमंत्री तोंड झाकून हसल्या; वाचा… नेमकं काय घडलं!
महिंद्रामध्ये सांभाळलीत महत्वाची पदे
रामकृपा अनंतन यांनी आपल्या करिअरची सुरुवात इंटीरियर डिजाइनर म्हणून केली होती. २००५ मध्ये त्यांना महिंद्रा कंपनीने हेड ऑफ डिजाइन ही जबाबदारी दिली. त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनतर त्यांना १० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर महिंद्रा कंपनीकडून चीफ डिजाइनर बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळात थार, XUV 700, स्कॉर्पियो या तीन लोकप्रिय गाड्यांचे डिझाईन बनवले आहे.
किती आहे रामकृपा अनंतन यांची संपत्ती?
महिंद्रा कंपनीच्या थार गाडीच्या लोकप्रियतेसाठी अनेक लोकांनी योगदान दिले. मात्र, रामकृपा अनंतन यांनी बनवलेले थारचे डिझाईन लोकांना चांगलेच भावले. ज्यामुळे त्या लोकांमध्ये चांगल्याच प्रसिद्धीस आल्या आहेत. याशिवाय त्यांनी XUV 700, स्कॉर्पियो या महिंद्राच्या लोकप्रिय गाड्यांचे देखील डिझाईन केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रामकृपा अनंतन यांची एकूण संपत्ती तब्बल 330 कोटी रुपये इतकी आहे.