ओला इलेक्ट्रिक शेअर्समध्ये तुफान तेजी; 18 टक्क्यांनी वाढला भाव, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण!
ओला इलेक्ट्रिकने आपला तब्बल 6,145.56 कोटींचा आयपीओ नुकताच लॉन्च केला. २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. सामान्यपणे 72 रुपये ते 76 रुपये किंमत पट्टा असलेल्या या आयपीओच्या अल्पवधीतच मोठी उसळी घेतली आहे. लॉन्चिंगनंतर या आयपीओने प्रति शेअर १८ टक्क्यांनी उसळी घेत, तब्बल ९० रुपये प्रति शेअरची किंमत गाठली आहे.
कमीत-कमी 14,820 रुपयांची गुंतवणूक
इलेक्ट्रिक स्कूटर (ई-स्कूटर) उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ 2 ऑगस्ट रोजी खुला झाला. जो गुंतवणूकदारांसाठी 6 ऑगस्ट 2024 पर्यंत खुला होता. या आयपीओचा किंमत पट्टा 72 ते 76 रुपये असा होता. तर गुंतवणूकदारांना एका वेळी कमीत-कमी 14,820 रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी 195 शेअर्सचा लॉट खरेदी करणे आवश्यक होते.
हेही वाचा : मुंबईतील सर्वात महागड्या परिसरात ‘या’ उद्योगपतीने खरेदी केला आलिशान वाडा; …किंमत ऐकून अवाक व्हाल!
गुंतवणूकदारांचा मिळाला चांगला प्रतिसाद
भाविश अग्रवाल यांच्या कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तो एकूण 4.45 वेळा सदस्य झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी 4.05 पट सदस्यता घेतली होती. तर क्यूआयबी श्रेणीने 5.53 पट आणि एनआयआय 2.51 पट सदस्यता घेतली होती.
ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओची साईज 6,145.56 कोटी रुपये
ओला इलेक्ट्रिकचा आकार हा 6,145.56 कोटी रुपये इतका होता. या आयपीओअंतर्गत, कंपनीने एकूण 72.37 कोटी शेअर्सचा नवीन आयपीओ जारी केला होता. तर 8.49 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करण्यात आले होते. त्याच्या शेअर्सचे वाटप 7 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले. तर 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज (ता.९) ओला इलेकट्रीक कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्टिंग झाले आहेत.
हेही वाचा : इंटेलनंतर आता ‘या’ कंपनीचाही कामगार कपातीचा निर्णय; 10 टक्के कर्मचाऱ्यांना फटका!
कंपनीचे मार्केट कॅप 39,794.51 कोटी रुपयांवर
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) प्रति शेअर 3 रुपये होता, परंतु यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 18 टक्क्यांहून अधिक वाढले. ते सध्या प्रति शेअर 90 रुपयांच्या वर व्यवहार करत आहेत. ओला इलेक्ट्रिक कंपनीचे मार्केट कॅप 39,794.51 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.