
Pi Network surges while crypto market is in red! It even surpassed Bitcoin
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला जगातील सर्वात महाग क्रिप्टो आणि बिटकॉइन, देखील अपवाद ठरल्या नाहीत. गेल्या काही दिवसांत बिटकॉइनमध्ये लक्षणीय घट होत असून $90,000 च्या खाली किंमती आल्या आहेत. मात्र, याव्यतिरिक्त पाय नेटवर्क उसळी मारताना दिसत आहे. बुधवारी क्रिप्टो मार्केटमध्ये अंदाजे 0.85% घसरून $3 ट्रिलियनवर आला. गेल्या 24 तासांत काही क्रिप्टो कॉईन्स वगळता प्रमुख क्रिप्टोकरन्सी लाल झाल्या असून यात बिटकॉइन, इथेरियम, बायनान्स कॉइन आणि सोलाना या क्रिप्टो कॉईन्सचा समावेश आहे.
हेही वाचा : China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी
गेल्या काही तासात पाय नेटवर्क रिटर्नच्या बाबतीत बिटकॉइनपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. सकाळी बिटकॉइन 1% हून अधिक घसरणीसह सुमारे $87,250 वर असून या आठवड्यात 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या उलट, Pi Network मध्ये गुंतवणूकदार आनंदी आहेत. कारण, गेल्या 24 तासांत Pi Network 2.50% झेप घेत असून अंदाजे 21.77 रुपयांवर व्यवहार सुरू आहे. गेल्या 7 दिवसांत परिणामी 8% वाढ झाली असून यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे.
हेही वाचा : SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न
अख्ख्या क्रिप्टो मार्केट सध्या अस्थिर असूनही पाय नेटवर्क मात्र प्रचंड उसळी मारत आहे. मागील महिन्यात पाय नेटवर्क अंदाजे 24 रुपयांपर्यंत पोहोचले असून या शेअरने बिटकॉइनपेक्षाही अधिक परतावा परत दिला आहे. बिटकॉइनमध्ये या दरम्यान सुमारे 25% घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युरोपियन युनियनच्या क्रिप्टो-अॅसेट रेग्युलेशन (MiCA) मध्ये पाय नेटवर्कने त्यांचे आदेश पाळण्याने त्यांची या महिन्यात $0.30 पर्यंत किंमत पोहोचली.
Pi Network म्हणजे काय?
Pi Network ही एक क्रिप्टोकरन्सी व मोबाईल-आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म असून ज्यामुळे सामान्य लोकांना स्मार्टफोनवरुन क्रिप्टोकरन्सीची सुविधा देते. यामध्ये प्रमुख 7 क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहेत. ज्यात OKX, Gate.io, Bitget आणि CoinDCX, हेसुद्धा सूचीबद्ध आहे.