
Post Office new MIS Scheme
Post Office MIS Scheme : पोस्ट ऑफिस विवाहित स्त्रियांसाठी नवी योजना घेऊन येत आहे. मासिक उत्पन्न योजना (MIS) योजनेअंतर्गत विवाहित स्त्रियांना दरमहा काही किंमत व्याज स्वरुपात मिळणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस योजनेअंतर्गत 4 लाख जमा केल्यावर खातेदारला दरमहा 9,250 रु. व्याज मिळेल. मासिक उत्पन्न आणि गुंतवणूक या योजनेमध्ये फायद्याचे ठरणार आहे.
विशेष तज्ञांच्या मते, दीर्घकाळात नियमित गुंतवणुकीमुळे चांगला रिटर्न मिळू शकतो. बाजारात सध्या अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असल्याने त्यामध्ये जोखीम असण्याची शक्यता आहे. तथापि, सरकारी योजना आणि बँक ठेवींसारख्या गुंतवणुकींमध्ये हमी परतावा मिळतो, त्यामुळे जोखीम घेण्याचा प्रश्नच नसतो.
हेही वाचा : How to open a Bank: बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात? एखादा उद्योगपती बँक उघडू शकतो का?
पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी विविध आर्थिक योजना काढत असते. यामध्ये आता मासिक उत्पन्न योजना ही मध्यम वर्गामध्ये लोकप्रिय ठरली असून यामुळे सुरक्षित बचत करता येते. या योजनेच्या गुंतवणुकीत एकरकमी रक्कम महत्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला मासिक व्याजदर मिळू शकते.
या योजने अंतर्गत पोस्ट ऑफिसच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला 7.4% व्याजदर मिळणार असून यामुळे तुमचे मानसिक उत्पन्न स्थिर राहील. या योजने अंतर्गत तुम्हाला 1 हजार म्हणजे एकरकमी गुंतवणूक करता येईल. ते जास्तीत जास्त तुम्ही 9 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेअंतर्गत, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करता येतील.
एमआयएस खात्याचा परिपक्वता कालावधी ५ वर्षांचा असतो. त्यानंतर निश्चित मासिक व्याज रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल. ही योजना ५ वर्षांनी संपेल. मुदत पूर्ण झाल्यानंतर, एमआयएस खात्यात जमा केलेले सर्व निधी बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. या योजनेअंतर्गत, जोडीदारासह संयुक्त खाते सहजपणे उघडता येईल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी, पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. जर एखाद्याचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते नसेल, तर मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत खाते उघडण्यापूर्वी त्यांना ते उघडावे लागेल. पोस्ट ऑफिस हा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील एक सरकारी विभाग असल्याने, सर्व पोस्ट ऑफिस योजनांमध्ये एखाद्याचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.