Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 बीएचके फ्लॅटचे भाडे 43000 रुपये, 2.5 लाख रुपये डिपॉझिट; …लोक म्हणतायेत किडनी विकावी लागेल!

देशात दिल्ली येथील नोएडा भागानंतर रेंट आणि डिपॉझिटच्या बाबतीत बंगळुरू शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूमध्ये घरभाडे ८ टक्क्यांनी वाढले आहे. एका महिलेने आपला फ्लॅट भाड्याने देण्यासाठी समाजमाध्यवर पोस्ट केली आहे. ज्यात तिने २ बीएचके फ्लॅटचे मासिक ४३००० रुपये भाडे आणि 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर एका युजरने एवढे डिपॉझिट भरण्यासाठी मला ब्लॅकने बाजारात किडनी विकावी लागेल. असे म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 03, 2024 | 08:58 PM
2 बीएचके फ्लॅटचे भाडे 43000 रुपये, 2.5 लाख रुपये डिपॉझिट; ...लोक म्हणतायेत किडनी विकावी लागेल!

2 बीएचके फ्लॅटचे भाडे 43000 रुपये, 2.5 लाख रुपये डिपॉझिट; ...लोक म्हणतायेत किडनी विकावी लागेल!

Follow Us
Close
Follow Us:

कोरोना काळात अनेक जण गावांकडे जात होते. तर अनेक नामांकित कंपन्यांनी त्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. ज्यामुळे ऑफिसेस, फ्लॅट ओस पडली होती. मात्र, आता काही वर्षांमध्ये दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या मेट्रो शहरांमध्ये भाड्याने उपलब्ध होणाऱ्या प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचाच एक भाग आता बंगळुरू या शहरात पाहायला मिळाला आहे.

महिलेची फ्लॅट भाड्याने देण्यासाठी पोस्ट

लिशा अग्रवाल नामक एक महिला बंगळुरू शहरातून कामानिमित्त बाहेरच्या शहरात राहण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तिने आपल्या मालकीचा २ बीएचके फ्लॅट भाड्याने देण्यासाठी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. तिचा हा फ्लॅट बंगळुरूच्या कोरामंगला या भागात असून, तो विप्रो कंपनीच्या अगदी जवळ आहे. या महिलेने आपल्या या फ्लॅटसाठी चौकशी सुरु केली असून, तिने आपल्या संबंधित २ बीएचके फ्लॅटचे मासिक ४३००० रुपये भाडे आणि 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? …मोजता-मोजता थकून जाल!

युजर म्हणतो, मला किडनी विकावी लागेल!

सध्या या महिलेची ही पोस्ट समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. या सर्वांमध्ये एका युजरने एकदम मजेशीर कमेंट केली आहे. त्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे की, “घर तर चांगले आहे. मात्र, २.५ लाख रुपये डिपॉझिट खूपच जास्त आहे. हे डिपॉझिट भरण्यासाठी मला ब्लॅकने बाजारात किडनी विकावी लागेल.”

We are moving out of our current 2BHK in Koramangala and looking for someone who’d be interested in taking it up! Want someone who will be willing to take it as it is (with all the furnishings). Rent 43k, deposit 2.5L, all furniture additional costs. DM for details! pic.twitter.com/aUr5lwnMWF

— Leesha Agarwal (@Theleeshesh) August 1, 2024


काय प्रतिउत्तर दिलंय ‘या’ महिलेने?

यावर लिशा अग्रवाल यांनी म्हटले आहे की, मला माहितीये हा वेडपटपणा आहे. मात्र, बंगळुरू शहरात घर भाड्याने देताना हाच ट्रेंड सुरु आहे. मी मागील दोन वर्षांपासून बंगळुरूमध्ये राहत असून, या ठिकाणी घर भाड्याने देताना डिपॉझिट असेच गगनाला भिडले आहे. दरम्यान, अन्य एका युजरने याबाबत कमेंट करताना म्हटले आहे की, यात नवीन असे काही नाही. मी बंगळुरूच्या व्हाइटफील्ड भागामध्ये इतकेच डिपॉझिट दिले आहे. तर अन्य एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, सहा महिन्यांचे घर भाडे डिपॉझिट म्हणून द्यावे लागत असेल तर मी एखाद्या हॉटेलमध्ये राहणे पसंत करिन.

हेही वाचा : ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल…

नोएडानंतर बंगळुरूमध्ये सर्वाधिक घरभाडे

प्रॉपर्टी कन्सलटन्ट कंपनी एनारॉकच्या अहवालानुसार, देशात दिल्ली येथील नोएडा भागानंतर रेंट आणि डिपॉझिटच्या बाबतीत बंगळुरू शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूमध्ये घरभाडे ज्या ठिकाणी ८ टक्क्यांनी वाढले आहे. त्या तुलनेत चेन्नई ४ टक्के आणि हैद्राबादमध्ये ५ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील सर्वच शहरांमध्ये भाड्याच्या घरांच्या मागणीत वाढ होत आहे.

Web Title: Property rates in india 2 bhk flat rent rs 43000 deposit rs 2 5 lakh people say kidney has to be sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.