मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? ...मोजता-मोजता थकून जाल!
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबई येथील अँटिलिया हाऊस हे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच त्यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंट हिच्यासोबत पार पडला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराची आणि अन्य बाबींची सध्या खूपच चर्चा होत आहे. मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला महिना तब्बल २ लाख रुपये इतका पगार असल्याचे नुकतेच माध्यमांमध्ये समोर आले होते. त्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसमधील स्वयंपाकी आणि अन्य नोकरांना किती पगार मिळतो? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…
किती आहे स्वयंपाकीला पगार?
सध्याच्या घडीला सर्वसाधारण माणसाला मिळणारे वेतन पाहता, अंबानी यांच्या घरातील नोकर, स्वयंपाकी आणि ड्रायव्हर यांचा पगार डोळे विस्फारणारा आहे. आज ज्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २५ हजारांच्या आसपास मासिक पगार मिळतो. त्याच ठिकाणी अंबानी यांच्या घरातील स्वयंपाकी तब्बल आठ पटीने अधिक पगार कमवातात. विशेष म्हणजे हा आकडा मोठमोठ्या कंपन्यांमधील मोठ्या अधिकार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षाही अधिक आहे. परिणामी, मुकेश अंबानी यांच्या घरातील स्वयंपाकी महिना २ लाख रुपये कमावतो. हे ऐकून तुम्ही चाट पडल्याशिवाय राहणार नाही.
पगाराव्यतिरिक्त मिळतात ‘या’ सुविधा?
मुख्य म्हणजे अँटिलिया हाऊसमध्ये काम करणारे कर्मचारी हे अन्य ठिकाणी काम करणाऱ्या त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूपच अधिक पगार मिळवतात. पगारच नाही तर मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुविधा, जेवणाची व्यवस्था, प्रवास खर्च आणि वैद्यकीय सेवा देखील पुरवतात. अँटिलिया हाऊसमध्ये असलेल्या अनेक गोष्टी या अत्यंत गोपनीय ठेवल्या जातात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत देखील उघडपणे बाहेर सांगितले जात नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये या कर्मचाऱ्यांच्या पगारबाबतची अचूक आकडेवारी देण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षकांनाही मिळतो उच्च श्रेणीत पगार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँटिलिया हाऊसमधील स्वयंपाकी हा महिन्याला तब्बल २ लाख रुपये पगार मिळवतो. काही स्वयंपाकी हे महिना २ लाखाहून देखील अधिक कमाई करतात. विशेष म्हणजे अँटिलिया हाऊसमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार अधिक पगार दिला जातो.
स्वयंपाकी व्यतिरिक्त अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसमध्ये सुरक्षेला खूप महत्व दिले जाते. त्या ठिकाणी २४ तास सुरक्षा व्यवस्था अलर्टवर ठेवली जाते. अर्थात सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील अँटिलिया हाऊसमध्ये उच्च श्रेणीमध्ये पगार दिला जातो. त्यामुळेच अँटिलिया हाऊसमध्ये काम कर्मचाऱ्यांची मुले विदेशात शिक्षण घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अन्य सर्व सुविधा मिळतात.