जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुण्यात एका सामान्य कुटुंबात जन्मलेले चंद्रकांत गायकवाड एका शिपायाचे सुपुत्र होते. घरची परिस्थिती अगदी हालाखीची होती. यामुळे दहावीनंतर गायकवाड यांनी ऑफिस बॉयचे काम करत लॉ चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी २००३ मध्ये प्रॅक्टिस आणि २००५ मध्ये कन्सल्टन्सी सुरु केली. २००९ मध्ये गायकवाड यांनी ब्रिस्क कंपनी स्थापन करुन मॅनेजमेंट क्षेत्रात मोठे पाउल टाकले. २०१२ पर्यंत गायकवाड यांच्या कंपनीने १०० कोटींची उलाढाल करत आज १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी सध्या महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कार्यरत आहे. ४० हजाराहून अधिक कॉनट्रॅक्ट्स कर्मचारी या कंपनीमार्फत सेवा पुरवते. आता या कंपनीने शार्प इंडिया कंपनीत ७५ टक्के शेअर खेरदी केले आहे. या कंपनीत इलेक्ट्रॉनिक आणि हाय-टेक मॅन्युफ्चरिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शार्प इंडियामध्ये कार्यरत असलेल्या ८० कर्मचाऱ्यांची जबाबदारी स्मार्ट सर्व्हिसेसने घेतली आहे. येत्या काळात स्मार्ट सर्व्हिसेस सेमीकंडक्टर निर्मितीतही गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. शार्पच्या दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू पुन्हा नव्याने बाजार पेठेत आण्याचा गायकवाड यांचा हेतू आहे.
केवळ महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित न राहता राजस्थान, दिल्ली, तेलंगणा या राज्यांमध्ये स्मार्ट सर्व्हिसेसने आपला व्यवसाय पसरवला आहे. आता ही कंपनी थेट जपानमध्येही मालकी मिळवणार आहे. ही मराठी उद्योजकतेमध्ये अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
बाप रे! Akshaya Tritiya चा गोडवा महागला? बाजारपेठेत आंब्याची मोठी आवक, पण दर तब्बल…






